ऑस्ट्रियाविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यामध्ये विराट कोहली याची बॅट तळपलेली दिसली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 75 वे शतक झळकावले. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात विराटने 186 धावा केल्या. अवघ्या 14 धावांमुळे विराट शतकापासून तो वंचित राहिला. अशातच सोशल मीडियावर अनुष्का शर्मा हिची एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराटच्या तब्येतीबाबत खुलासा केला आहे.
आजारपणातही खूप संयमाने फलंदाजी केली. तू मला नेहमीच प्रेरणा दिलीस, अशा आशयाची पोस्ट अनुष्काने केली आहे. विराटने 186 धावांची धडाकेबाज खेळी केली मात्र तो खरंच आजारी होता का? याबाबत क्रीडा वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.
कोहलीने आजारी असतानाही शतक झळकावले आणि भारताला मजबूत स्थितीत नेलं. अनुष्काच्या पोस्टमुळे चाहत्यांनाही प्रश्न पडला असून यावर अक्षर पटेल याने नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
माहीत नाही पण विराट ज्या पद्धतीने विकेट्सच्या दरम्यान धावत होता, त्यावरून तो आजारी आहे असे वाटलं नाही, असं अक्षर पटेल म्हणाला. त्यामुळे विराट जर अंगावर दुखणं काढून खेळला असेल तर पुढे मोठा धक्का बसू शकतो. टीम मॅनेजमेंटने यामध्ये लक्ष घालायला हवं.
विराटने आपलं शतकाचा दुष्काळ संपवला आहे. रविवारी अहमदाबादमध्ये विराट कोहलीची 40 महिन्यांची प्रतिक्षा संपली. त्याने मागच कसोटी शतक बांग्लादेश विरुद्ध 2019 मध्ये झळकवलं होतं.