IND vs BAN : आर अश्विननंतर रवींद्र जडेजाची कमाल, अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडिया सुस्थितीत

| Updated on: Sep 19, 2024 | 4:36 PM

बांग्लादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी डाव सावरला. पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात आर अश्विननंतर रवींद्र जडेजाने अर्धशतकी खेळी केली.

1 / 5
भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. पहिला कसोटी सामना चेन्नईत होत आहे. या सामन्यात आर अश्विन आणि रवींद्र जडेजा जोडीने कमाल केली. शतकी भागीदारीमुळे टीम इंडिया चांगल्या स्थितीत आली आहे.

2 / 5
रवींद्र जडेजा फलंदाजीला उतरला तेव्हा 144 धावांवर 5 विकेट अशी स्थिती होती. त्यानंतर लगेचच केएल राहुलच्या रुपाने सहावी विकेट पडली. त्यामुळे टीम इंडियावर दडपण होतं. पण आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने डाव सावरला.

3 / 5
रवींद्र जडेजाने 73 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याने 5 चौकार आणि 1 षटकार मारला.  बांगलादेशविरुद्ध रवींद्र जडेजाचं हे तिसरं अर्धशतक आहे. तिन्ही अर्धशतकं भारतातच केली आहेत.

4 / 5
जडेजा आणि अश्विनने सातव्या विकेटसाठी 100 हून अधिक धावांची भागीदारी करताना 24 वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला. यापूर्वी, भारताकडून बांगलादेशविरुद्ध सातव्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम सौरव गांगुली आणि सुनील जोशी यांच्या नावावर होता. त्यांनी 2000 मध्ये ढाका कसोटी सामन्यात 121 धावांची भागीदारी केली होती.

5 / 5
दुसरीकडे, रवींद्र जडेजा या कसोटीत त्रिशतक ठोकण्याची शक्यता आहे. हे त्रिशतक विकेटचं असणार आहे. 2012 कसोटीत पदार्पण केल्यानंतर 72 कसोटीत 294 विकेट घेतल्या आहेत. आणखी 6 विकेट घेताच त्रिशतक पूर्ण होईल. (सर्व फोटो- बीसीसीआय)