IND vs BAN : धोनीच्या विक्रमाची बरोबरी, कर्टनी वॉल्शचा रेकॉर्ड ब्रेक, अश्विनचा धमाका
R Ashsin IND vs BAN 1st Test : लोकल बॉय आर अश्विन याने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये शतक आणि 6 विकेट्स घेत टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. अश्विनने यासह काही खास विक्रम केले आहेत.
1 / 6
आर अश्विन याच्या ऑलराउंड कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी 280 धावांची विजय मिळवला. अश्विनने या सामन्यात शतकी खेळीसह 6 विकेट्सही घेतल्या. अश्विनने यासह काही विक्रम आपल्या नावावर केले. तर काही विक्रमांची बरोबरी केली. (Photo Credit : Bcci)
2 / 6
अश्विनने पहिल्या डावात 113 धावांची शतकी खेळी केली. अश्विनच्या कसोटी कारकीर्दीतील हे एकूण सहावं तर चेन्नईतील घरच्या मैदानातील सलग दुसरं शतक ठरलं. अश्विनने यासह धोनीच्या सहा शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. (Photo Credit : Bcci)
3 / 6
अश्विनने रवींद्र जडेजासह शानदार भागीदारी करत भारताला मजबूत स्थितीत आणलं. अश्विन-जडेजा जोडीने पहिल्या डावात सातव्या विकेटसाठी 199 धावांची भागीदारी केली. ही सर्वोत्तम भागीदारीपैकी एक ठरली. (Photo Credit : Bcci)
4 / 6
अश्विनला पहिल्या डावात एकही विकेट मिळाली नाही. अश्विनसोबत घरच्या मैदानात 2016 नंतर विकेट न मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरली. मात्र त्यानंतर अश्विनने दुसऱ्या डावात भरपाई केली. अश्विनने दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेतल्या. (Photo Credit : Bcci)
5 / 6
अश्विनची 5 विकेट्स घेण्याची ही 37 वी वेळ ठरली. अश्विनने यासह दिग्गज शेन वॉर्नच्या 37 वेळा 5 विकेट्स घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. तसेच अश्विन 37 वेळा 5 विकेट्स घेणारा पहिला सक्रीय गोलंदाजही ठरला आहे. सर्वाधिक 5 विकेट्स घेण्याचा विक्रम हा माजी फिरकीपटू मुथैय्या मुरलीथरन याच्या नावावर आहे. (Photo Credit : Bcci)
6 / 6
अश्विनने चौथ्या दिवशी शाकिब अल हसन याला आऊट करत बांगलादेशला पहिला झटका देत वैयक्तिक चौथी विकेट घेतली. अश्विनने यासह कर्टनी वॉल्श यांना मागे टाकलं. वॉल्श यांनी कसोटी कारकीर्दीत 519 विकेट्स घेतल्या होत्या. तर आता अश्विनच्या नावावर 522 विकेट्सची नोंद आहे. (Photo Credit : Bcci)