विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक कारनामा, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
विराट कोहलीची बॅट अखेर दुसऱ्या कसोटी तळपली. पहिल्या कसोटी फेल गेल्यानंतर दुसऱ्या कसोटीत त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. अखेर त्याने हा विश्वास सार्थकी ठरवला. चौथ्या क्रमांकावर त्याच्याऐवजी ऋषभ पंतला पाठवलं आणि तो बाद झाल्यानंतर विराट कोहलीचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला.
1 / 5
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. बांगलादेशने पहिल्या डावात केलेल्या 233 धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने आक्रमक खेळी केली. त्याने केएल राहुलसोबत 80 हून अधिक धावांची भागीदारी केली.
2 / 5
विराट कोहलीने 35 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 47 धावा केल्या. पण त्याचं अर्धशतक अवघ्या 3 धावांनी हुकलं. डावखुऱ्या शाकीब अल हसनचा बळी ठरला. त्याने विराट कोहलीचा त्रिफळा उडवला. पण त्याची ही खेळी योग्य वेळी आल्याने त्याच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
3 / 5
विराट कोहलीने या सामन्यात 27 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगाने 27 हजार धावा करण्याचा मान त्याला मिळाला आहे. विराट कोहलीने 594 डावात हा विक्रम केला आहे. तर सचिन तेंडुलकरने 623, कुमार संगकाराने 648 आणि रिकी पाँटिंगने 650 डावात हा पल्ला गाठला आहे.
4 / 5
विराट कोहलीने पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावात मिळून 23 धावा केल्या होत्या. तसेच त्याला 27 हजारांचा पल्ला गाठण्यासाठी दुसऱ्या डावात 35 धावांची गरज होती. दुसऱ्या डावात 47 धावा करत 27 हजारांच्या पल्ला ओलांडला आहे.
5 / 5
विराट कोहलीच्या रडारवर आता रिकी पाँटिंगचा विक्रम आहे. त्याने 27483 धावा केल्या आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साखळीत भारताला आणखी 8 सामने खेळायचे आहेत. विराट कोहलीच्या 27012 धावा आहेत. रिकी पाँटिंगचा विक्रम मोडण्यासाठी त्याला 472 धावांची गरज आहे. (सर्व फोटो- बीसीसीआय)