IND vs BAN : पहिल्या कसोटीपूर्वी गंभीरने जाहीर केली प्लेइंग इलेव्हन! तीन फिरकीपटू खेळणार, 2 प्लेयर ‘आऊट’
भारत आणि बांग्लादेश कसोटी सामन्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. टीम इंडिया कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार याची उत्सुकता आहे. असं असताना प्रशिक्षक गौतम गंभीरने याबाबत खुलासा केला आहे. दोन खेळाडूंना संधीची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
1 / 6
भारत आणि बांग्लादेश यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये 19 सप्टेंबरपासून पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह टीम इंडिया उतरणार याची उत्सुकता लागून आहे. याबाबत प्रशिक्षक गौतम गंभीरने एक मोठी अपडेट दिली आहे.
2 / 6
गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलं की, सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांना काही काळ वाट पाहावी लागेल. म्हणजेच संघात केएल राहुल आणि ऋषभ पंत यांना स्थान मिळणार आहे. भारतात झालेल्या मागच्या कसोटी सामन्यात ध्रुव जुरेल यष्टीरक्षक होता. पण त्याची जागा आता ऋषभ पंत घेणार आहे.
3 / 6
सहाव्या स्थानासाठी सरफराज खान आणि केएल राहुल यांच्या नावाची चर्चा झाली. शेवटच्या कसोटी सामन्यात सरफराजने चांगली कामगिरी होती. तर दुखापतीमुळे केएल राहुल खेळू शकला नव्हता. पण त्या आधीच्या मालिकेत केएल राहुलने चांगली कामगिरी केली होती. आता अनुभवाच्या पातळीवर केएल राहुलची निवड झाली आहे.
4 / 6
कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे सलामीला येतील. तर शुबमन गिल तिसऱ्या स्थानावर उतरेल. तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. तसेच तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाज संघात असतील.
5 / 6
आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे फिरकीपटू असतील. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजच्या खांद्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल यात काही शंका नाही.
6 / 6
पहिल्या कसोटीसाठी भारताचा संभाव्य संघ: रोहित शर्मा, यशवी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.