IND vs BAN : रोहित शर्मा याने मोडला आणखी एक विक्रम, एक वर्षात अशी कामगिरी करणारा पहिला कर्णधार
World Cup 2023, IND vs BAN :भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात एक षटकार ठोकताच एका विक्रमाची नोंद केली आहे. त्याने इयोन मॉर्गनचा विक्रम मोडीत काढला आहे. नेमकं काय केलं ते वाचा
1 / 6
रोहित शर्मा याने वनडे वर्ल्डकप स्पर्धा 2023 मध्ये बांगलादेश विरुद्ध एक षटकार ठोकत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार इयोन मॉर्गन याला मागे टाकलं आहे.
2 / 6
रोहित शर्मा याने कर्णधार म्हणून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. कर्णधारांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे.
3 / 6
मॉर्गनने 2019 या वर्षात 60 षटकार ठोकले होते. पण रोहित शर्मा याने 62 षटकार ठोकत त्याला मागे टाकलं आहे. यात 59 षटकारांसह एबी डिव्हिलियर्स तिसऱ्या स्थानावर आहे.
4 / 6
आशिया देशांमध्ये रोहित शर्मा याने 6000 वनडे धावाही पूर्ण केल्या आहेत. असं करणारा रोहित शर्मा सातवा फलंदाज आहे. या यादीत सचिन तेंडुलकर, विराट कोहली, एमएस धोनी, सौरव गांगुली, अझरुद्दीन, राहुल द्रविड हे खेळाडू आहेत.
5 / 6
कर्णधार रोहित शर्मा याने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात 7 चौकार आणि दोन षटकरांच्या मदतीन 48 धावा केल्या. रोहित शर्मा याचं अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. पुल शॉट मारताना गडबड झाली आणि हृदोयनं झेल घेतला.
6 / 6
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमवून 256 धावा केल्या आणि विजयासाठी 257 धावांचं आव्हान दिलं आहे. भारताने 2 बाद 150 हून अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे या सामन्यात सहज विजय मिळेल. दुसरीकडे, भारताचा पुढचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे