भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका आहे. या मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरला सुरु होणार आहे. या मालिकेत कर्णधार रोहित शर्मासोबत ओपनिंगला यशस्वी जयस्वाल येईल यात शंका नाही. या कसोटी मालिकेत यशस्वी जयस्वाल एक विक्रम रचू शकतो.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत यशस्वी जयस्वालने धावांचा पाऊस पाडला होता. दोन द्विशतकांसह 700 हून अधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध त्याची फलंदाजी कशी होते याकडे लक्ष लागून आहे. यशस्वी जयस्वाल 2023-26 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताकडून एक इतिहास रचणार आहे. यासाठी त्याला फक्त 132 धावांची गरज आहे.
यशस्वी जयस्वालने वर्ल्ड टेस्ट कसोटीच्या सध्याच्या हंगामात 1028 धावा केल्या आहेत. डब्ल्यूटीसीच्या एका पर्वात भारताकडून सर्वाधिक धावा करण्यासाठी त्याला फक्त 132 धावा करायच्या आहेत. यापूर्वी सर्वाधिक धावांचा विक्रम अजिंक्य रहाणेच्या नावावर आहे. त्याने 2019-21 या वर्षात सर्वाधिक 1159 धावा केल्या आहेत.
यशस्वी जयस्वालने इंग्लंडच्या बेन डकेटची सध्या बरोबरी केली आहे. त्यानेही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 1028 धावा केल्या आहेत. इंग्लंडचा जो रूट सध्या या पर्वात आघाडीवर आहे. त्याने आतापर्यंत 1398 धावा केल्या आहेत. यात 5 शतकं आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे.
यशस्वी जयस्वालने या मालिकेत 371 धावांचा पल्ला गाठला तर जो रूटला मागे टाकले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या एका पर्वात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. बांग्लादेश कसोटी पकडून भारत 10 कसोटी सामने खेळणार आहे.