भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना केवळ औपचारिकता आहे. कारण टीम इंडियाने टी20 मालिका आधीच जिंकली आहे. (Photo : BCCI)
तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला तर पाकिस्तानचा दुर्मिळ विक्रम मोडेल. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत भारत आणि पाकिस्तान समान सामने जिंकले आहेत. आता तिसरा सामना जिंकल्यास टीम इंडिया पाकिस्तानला मागे टाकेल.
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत युगांडा पहिल्या स्थानावर आहे. युगांडाने टी20 क्रिकेटमध्ये 2023 या वर्षात 29 सामने जिंकले आहेत. (Photo : BCCI)
टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर असून युगांडाचा विक्रम मोडण्यात अपयश आले. 2022 मध्ये टीम इंडियाने एकूण 28 टी20 सामने जिंकले. या दोन संघांनंतर टांझानियन संघ 2022 मध्ये 21 टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे. (Photo : BCCI)
भारत या यादीत चौथ्या क्रमांकावर विराजमान होण्यास सज्ज आहे. भारतीय संघाने या वर्षी 20 टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. यापूर्वी 2020 मध्ये पाकिस्तानने 20 सामने जिंकले होते. याचा अर्थ भारत आणि पाकिस्तानचे संघ या बाबतीत समान आहेत.हैदराबादमध्ये होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया जिंकल्यास पाकिस्तानला मागे टाकेल. टीम इंडियाचे नाव दोनदा टॉप 5 मध्ये येईल. (Photo : BCCI)