IND vs ENG : दुसऱ्या कसोटीत बेन स्टोक्स इतिहास रचणार! तसं झालं तर मिळणार मानाचं स्थान
टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत करत इंग्लंडने मालिकेत आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या मालिकेत विजय मिळवला तर कर्णधार बेन स्टोक्सच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे.
1 / 6
इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आशियामध्ये नवा इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतच या विक्रमाची नोंद होण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या कर्णधाराकडे आशिया खंडात सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम लिहिण्याची चांगली संधी आहे.
2 / 6
आशियामध्ये आधीच 4 कसोटी सामने जिंकलेल्या बेन स्टोक्सने टीम इंडियाविरुद्ध आगामी 4 पैकी 3 सामने जिंकल्यास नवा विक्रम प्रस्थापित करेल. माजी कर्णधार जो रूटचा विक्रमही मोडीत निघणार आहे.
3 / 6
आशिया खंडात सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम जो रूटच्या नावावर आहे. जो रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने आशिया खंडात एकूण 9 कसोटी सामने खेळले. यावेळी इंग्लंडने 6 सामन्यात विजय मिळवला आहे.
4 / 6
या यादीत माजी कर्णधार ॲलिस्टर कुक दुसऱ्या क्रमांकावर आहे. आशियामध्ये कुकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने एकूण 16 सामने खेळले असून यावेळी इंग्लिश संघाने 5 सामने जिंकले आहेत.
5 / 6
आशियातील चार सामन्यांत इंग्लंड संघाचे नेतृत्व करणाऱ्या बेन स्टोक्सने चारही सामने जिंकले आहेत. इंग्लंडने भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकल्यास स्टोक्स ॲलिस्टर कुकच्या 5 विजयांच्या विक्रमाची बरोबरी करेल.
6 / 6
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 4 सामन्यांत विजय मिळवल्यास बेन स्टोक्स आशिया खंडातील इंग्लंडचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरेल. न स्टोक्सला आगामी सामन्यांच्या माध्यमातून कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास लिहिण्याची संधी आहे.