IND vs ENG 2nd Test | इंग्लंडला दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या तिघांपासून धोका

| Updated on: Jan 31, 2024 | 6:12 PM

India vs England 2nd Test | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा विशाखापट्टणममध्ये होणार आहे. टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे.

1 / 6
टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धचा पहिला कसोटी सामना हा 28 धावांनी गमावला. इंग्लंडने पहिल्या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

2 / 6
मालिकेतील दुसरा सामना हा 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणम इथे होणार आहे. या सामन्यात केएल राहुल आणि रवींद्र जडेजा हे दोघे दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत. त्यामुळे टीम इंडियाला मोठा झटका लागलाय. मात्र टीम इंडियाला चिंता करण्याची गरज नाही. कारण, टीम इंडियाचे 3 खेळाडू हेच इंग्लंडला पुरेसे आहेत. ते तिघे कोण आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

3 / 6
रोहित शर्मा, टीम इंडियाचा कॅप्टन. रोहित शर्मासाठी वायझॅगचं हे मैदान फार लकी आहे. रोहितने 2016 मध्ये इंग्लंडला याच मैदानात झोडून काढला होता. रोहितने तेव्हा दोन्ही डावात शतकी खेळी केली होती.   तसेच तेव्हा टीम इंडियाने 246 धावांनी विजय मिळवला होता. रोहितने पहिल्या डावात 176 आणि दुसऱ्या  डावात 127 धावा केल्या होत्या. त्यामुळे रोहितचा 2016 मधील तोच अंदाज पुन्हा पाहायला मिळाला, तर इंग्लंडचं काही खरं नाही.

4 / 6
आर अश्विन याने इंग्लंड विरुद्ध 2016 च्या सामन्यात 8 विकेट्स घेतल्या होत्या. अश्विनकडून अशीच कामगिरी ही दुसऱ्या कसोटीत अपेक्षित असणार आहे.

5 / 6
टीम इंडियाने आतापर्यंत विशाखापट्टणममध्ये एकूण 2 कसोटी सामने खेळले आहेत. टीम इंडियाने हे दोन्ही सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने 2016 मध्ये इंग्लंडनंतर 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेला चितपट केलं होतं. आता टीम इंडिया 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा याच मैदानात तिसरा विजय मिळवण्यासाठी तयार आहे.

6 / 6
यशस्वी जयस्वाल याने पहिल्या कसोटीत 80 धावांची खेळी केली. त्याच जोरावर टीम इंडियाने 190 धावांची आघाडी घेतली. जयस्वाल याच्याकडून दुसऱ्या कसोटीत मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.