IND vs ENG | इंग्लंडला लोळवण्यासाठी रोहितसेनेचा मास्टरप्लॅन

| Updated on: Feb 01, 2024 | 5:50 PM

India vs England 2nd Test | पहिली कसोटी गमावल्याने टीम इंडियावर रोहितच्या नेतृत्वात वर्षभरात मायदेशात तिसऱ्यांदा पराभूत होण्याची नामुष्की ओढावली. आता टीम इंडिया कमबॅकसाठी तयार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी कसून सराव केला. या सराव सत्रात खेळाडूंनी स्वीप आणि रिव्हर्स स्वीप शॉट मारण्यावर अधिक भर दिला.

1 / 5
टीम इंडियाच्या नव्या दमाच्या खेळाडूंना स्वीप शॉट सहजपणे मारता येत नाही. मात्र दुसऱ्या कसोटीआधी सरावादरम्यान अनेक खेळाडूंनी या शॉटसाठी सराव केला.

2 / 5
कॅप्टन रोहित शर्मा याच्या व्यतिरिक्त पहिल्या कसोटीत  टीम इंडियाच्या एकानेही स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला नाही. टीम इंडियाला पहिल्या कसोटीत 28 धावांनी पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियाचा हा मायदेशातील 2013 पासून चौथा कसोटी पराभव होता.

3 / 5
इंग्लंडने पहिल्या कसोटीत फिरकी गोलंदाजांचा प्रभावीपणे वापर करुन टीम इंडियाला बॅकफुटवर ढकल्यात यश मिळवलं. दरम्यान टीम इंडियाच्या फलंदाजांनी दुसऱ्या सामन्याआधी शुबन गिल याने स्वीप आणि रिव्हर्स स्वीपचा दणकून सराव केला.

4 / 5
टीम इंडियात संधी मिळालेल्या रजत पाटीदार याने सराव केला. रजत पाटीदार याला विराट कोहली याच्या जागी पहिल्या 2 सामन्यांसाठी टीममध्ये संधी देण्यात आली आहे.

5 / 5
सरफराज खान याची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड करण्यात आली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या सरफराज यानेही नेट्समध्ये घाम गाळला. बीसीसीआयने टीम इंडियाच्या सरावाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.