इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने 2-0 ने खिशात घातली आहे. तिसऱ्या सामन्यात भारताला पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली. भारताची सुरुवात निराशाजनक राहिली. पण त्यानंतर शुबमन गिलने आधी विराट कोहली आणि त्यानंतर श्रेयस अय्यर सोबत चांगली भागीदारी केली.
शुबमन गिलने 95 चेंडूत शतक पूर्ण केलं. मार्क वूडला चौकार ठोकत त्याने आपलं शतक साजरं केलं. यावेळी त्याने14 चौकार आणि 2 षटकार मारले. या फॉर्मेटमध्ये 507 दिवसानंतर त्याने शतक ठोकलं आहे. 24 डिसेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंदूरमध्ये शतक ठोकलं होतं.
शुबमन गिलने या शतकासह एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेट एकाच मैदानावर शतक ठोकणारा पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी फाफ डुप्लेसिस, डेविड वॉर्नर, बाबर आझम, क्विंटन डीकॉक यांनी एकाच मैदानात तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक ठोकण्याची कामगिरी केली आहे.
शुबमन गिल त्याच्या क्रिकेट कारकिर्दितील 50वा वनडे सामना खेळत आहे. या सामन्यातही त्याने एक विक्रम नोंदवला आहे. 50 व्या वनडे सामन्यात जलद शतक ठोकणाारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच सर्वात कमी डावात 7 शतक ठोकणारा खेळाडू ठरला आहे.
शुबमन गिलने 50 वनडे सामन्यात 15 अर्धशतक आणि 7 शतकं ठोकली आहेत. यात एका द्विशतकाचा समावेश आहे. शुबमन गिलने आतापर्यंत वनडे सामन्यात 56 षटकार आणि 297 चौकार मारले आहेत. (सर्व फोटो- बीसीसीआय)