लेकाच्या अनेक वर्षांच्या मेहनतीला यश, सरफराजला कॅप घेताना पाहून बाप माणसाला अश्रू अनावर
Sarfaraz Khan Father Emotional | सरफराज खान गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत होता. अखेर त्याला टीममध्ये संधी मिळाली आणि त्याचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला.
1 / 7
इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने 4 बदल केले. टीम इंडियाकडून या सामन्यात 2 युवा खेळाडूंनी पदार्पण केलं आहे.
2 / 7
सरफराज खान आणि ध्रुव जुरेल या दोघांनी कसोटी पदार्पण केलं आहे. या दोघांचे फोटो बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3 / 7
ध्रुव जुरेल टीम इंडियाकडून कसोटीत पदार्पण करणारा 312 खेळाडू ठरला आहे. तर सरफराज खान हा 311 वा खेळाडू ठरलाय.
4 / 7
दिनेश कार्तिक याने ध्रुव जुरेल याला टेस्ट कॅप दिली. यावेळेस इतर सहकाऱ्यांनी ध्रुवचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
5 / 7
तर सरफराज खान याला अनिल कुंबळे यांनी टेस्ट कॅप दिली. सरफराजचं यासह अखेर अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. या अविस्मरणीय क्षणी सरफराज खानचे आई-वडीलही उपस्थित होते.
6 / 7
आपल्या लेकाला अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर टीम इंडियात संधी मिळाल्याचं स्वप्न पूर्ण होताना पाहून सरफराजच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. त्यांचा उर भरुन आला.
7 / 7
सरफराजने त्याच्या वडिलांच्या हातात कॅप दिली. यावेळेस सरफराजच्या वडिलांनी त्या कॅपला ओठांनी आदरपूर्वक स्पर्श केला. बाप-लेकाचा हा असा भावनिक क्षण अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला.