IND vs ENG 3rd Test | राजकोटमध्ये टीम इंडियासमोर आव्हान, इंग्लंडची 2016 साली विस्फोटक कामगिरी
IND vs ENG 3rd Test | इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे. सध्या 5 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. दोन्ही संघांसाठी तिसरा सामना हा निर्णायक असा असणार आहे.
1 / 5
इंग्लंडने पहिला सामना जिंकत विजयी सलामी दिली. तर टीम इंडियाने विशाखापट्टणममध्ये दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी केली. आता तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असणार आहे.
2 / 5
राजकोटमध्ये 2016 साली उभयसंघातील सामना बरोबरीत राहिला. इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या 500 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने 488 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडने काही धावांच्या आघाडीच्या जोरावर 260 वर डाव घोषित केला. तर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना पाचव्या दिवसाचा खेळ संपला आणि सामना अनिर्णित राहिला.
3 / 5
इंग्लंडच्या 4 फलंदाजांनी शतक झळकावलं होतं. त्या चौघांपैकी सध्याच्या टीममध्ये दोघे आहेत. यामध्ये जो रुट आणि बेन स्टोक्स यांचा समावेश आहे. त्यामुळे या दोघांना स्वसतात रोखण्याचं आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असणार आहे.
4 / 5
इंग्लंड टीम बेझबॉल पद्धतीने अर्थात कसोटीत टी 20 फॉर्मेटने फटकेबाजी करत आहे. इंग्लंडने पहिल्या सामन्यात 190 धावांनी पिछाडीवर असूनही सामना जिंकला होता. यावरुन इंग्लंड काय पद्धतीने आक्रमक बॅटिंग करतेय, याचा अंदाज बांधता येईल.
5 / 5
टीम इंडियाने आतापर्यंत राजकोटमध्ये 2 सामने खेळले आहेत. इंग्लंड विरुद्धचा 2016 सालचा सामना अनिर्णित राहिला. तर 2018 मध्ये विंडिज विरुद्ध डाव आणि 272 धावांच्या फरकाने तगडा विजय मिळवला. आर अश्विन याने या मैदानात सर्वाधिक 9 विकेट्स घेतल्या.