IND vs ENG : शुबमन गिलने पहिल्या डावातील शून्याची भरपाई केली दुसऱ्या डावात, ठोकलं दमदार अर्धशतक

| Updated on: Feb 17, 2024 | 5:11 PM

तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसावर टीम इंडियाने वर्चस्व प्राप्त केलं आहे. पहिल्या डावात भारताकडे 126 धावांची आघाडी होती. या धावांसह तिसऱ्या दिवशी 300 च्या पार धावा केल्या. त्यामुळे दुसऱ्या डावात 400 च्या आसपास धावा होण्याची शक्यता आहे. यशस्वी जयस्वालनंतर शुबमन गिलने अर्धशतकी खेळी केली.

1 / 6
राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने सामन्यावर आपली पकड मजबूत मिळवली. भारताच्या 300 धावांचा पल्ला ओलांडला आहे. दुसऱ्या डावात रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर शुबमन गिल आणि यशश्वी जयस्वाल यांनी मोर्चा सांभाळला.

2 / 6
यशस्वी जयस्वालच्या शतकानंतर गिलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. यशस्वीने षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले होते. तीच रणनिती अवलंबून गिलनेही मार्क वुडच्या चेंडूवर षटकार ठोकून अर्धशतक पूर्ण केले.

3 / 6
शुबमन गिलने 98 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. गिलचे कसोटी कारकिर्दीतील हे पाचवं अर्धशतक आहे. राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात गिलला खातेही उघडता आलं नव्हतं.

4 / 6
शुबमन गिलने आतापर्यंत 14 डावांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. पहिल्या 11 डावात त्याने 22.30 च्या सरासरीने 223 धावा केल्या आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या 47 धावा होती. तर दुसऱ्या डावातील तीन डावात त्याने 104, 0 आणि अर्धशतक केले.

5 / 6
शुबमन गिल आतापर्यंत 23 सामन्यात 43 झावात खेळला आहे. यात त्याचा सर्वोत्तम धावसंख्या ही 128 आहे. आतापर्यंत एकूण 1266 धावा केल्या आहेत. यात 3 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. 59.08 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

6 / 6
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज