Rohit Sharma | कॅप्टन रोहितने रांचीत रचला इतिहास, कोच राहुल द्रविडला मोठा धक्का

| Updated on: Feb 26, 2024 | 4:59 PM

Team India Captain Rohit Sharma | रोहित शर्माने टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. रोहितने 192 धावांचा पाठलाग करताना अर्धशतकी खेळी केली. तसेच टीम इंडियाला विजय मिळवून देत रोहितने मोठा रेकॉर्ड ब्रेक केला.

1 / 5
टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इंग्लंडचा चौथ्या कसोटीत चौथ्या दिवशी 5 विकेट्सने धुव्वा उडवला. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांची मालिका 3-1 ने जिंकली. कॅप्टन रोहितने या विजयासह मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तसेच विक्रमाची बरोबरी केली आहे.

2 / 5
रोहितचा इंग्लंड विरुद्धचा चौथ्या कसोटी सामन्यातील विजय हा कॅप्टन म्हणून नववा विजय ठरला. रोहितने यासह टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक आणि माजी कर्णधार राहुल द्रविडचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

3 / 5
रोहितने या नवव्या विजयासह टीम इंडियाचे दिग्गज लिटील मास्टर सुनील गावसकर यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. गावसकर यांनी आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला 9 सामने जिंकून दिले.

4 / 5
विराट कोहली याने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात सर्वाधिक कसोटी सामने जिंकून दिले आहेत. विराटच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाने 40 सामने जिंकले आहेत. तर दुसऱ्या बाजूला महेंद्रसिंह धोनीने भारताला 27 सामने जिंकून दिले आहेत. तसेच सौरव गांगुलीच्या कॅप्टन्सीत भारताने 21 वेळा प्रतिस्पर्धी संघावर मात केली आहे.

5 / 5
तर मोहम्मज अझहरुद्दीन यांनी भारताला 14 सामने जिंकून दिले. आता रोहितला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना जिंकून सुनील गावसकर यांच्या 9 विजयाचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.