IND vs ENG : पाचव्या कसोटी सामन्यात 15 वर्षानंतर घडलं असं काही, टॉप 5 फलंदाजांनी रचला इतिहास
पाचव्या कसोटीच्या दुसरा दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. इंग्लंडने पहिल्या डावात दिलेल्या 218 धावांचा पल्ला गाठत अधिकची 255 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे कसोटीवर भारताची मजबूत पकड निर्माण झाली. या कसोटी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी 15 वर्षानंतर एक मोठी कामगिरी केली आहे.
1 / 6
पाचव्या कसोटी सामन्यात भारताचं वर्चस्व दिसून आलं आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 8 गडी गमवून 473 धावा केल्या. यासह भारताकडे 255 धावांची मजबूत आघाडी आहे. त्यामुळे विजयाचं पारडं भारताच्या बाजूने झुकल्याचं दिसत आहे.
2 / 6
पाचवा सामना भारताने जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जबरदस्त फायदा होणार आहे. गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखता येणार आहे. तसेच अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास आणखी सोपा होणार आहे.
3 / 6
भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. विकेटसाठी गोलंदाजांना चांगलाच घाम काढावा लागला. झटपट विकेट घेण्यासाठी धडपड काही कामी आली नाही. भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली.
4 / 6
भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी अशी कामगिरी चौथ्यांदा केली आहे. 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा अशी कामगिरी करण्यात यश आलं होतं. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध मोहाली टेस्टमध्ये असाच कारनामा केला होता.
5 / 6
भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी 15 वर्षानंतर अशी कागमिरी केली आहे. यशस्वी जयस्वालने 57, रोहित शर्माने 103, शुबमन गिलने 103, देवदत्त पडिक्कलने 65 आणि सरफराज खानने 56 धावांची खेळी केली.
6 / 6
2009 मध्ये भारताच्या टॉप पाच फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली होती. श्रीलंका विरुद्ध मुंबईत ही कामगिरी केली होती. मुरली विजय 87, विरेंद्र सेहवाग 293, राहुल द्रविड 74, सचिन तेंडुलकर 53 आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने 62 धावा केल्या होत्या.