IND vs ENG : पाचवी कसोटी जिंकताच भारत रचणार इतिहास, 112 वर्षापूर्वी रेकॉर्डची करणार बरोबरी
भारताने पाच सामन्यांची कसोटी मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 7 मार्चपासून आहे. हा सामना भारताने जिंकला तर एक नवा इतिहास भारताच्या नावावर रचला जाईल. 112 वर्षानंतर कसोटी क्रिकेट मालिकेत अशी घटना घडणार आहे.
1 / 6
भारत आणि इंग्लंड पाच सामन्यांची कसोटी टीम इंडियाने जिंकली आहे. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यात 3-1 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पाचवा सामना जिंकून भारत या मालिकेचा शेवट गोड करण्याचा तयारीत आहे.
2 / 6
धर्मशाळेत पाचवा कसोटी सामना जिंकताच भारत एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर करणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या संघांची बरोबरी करण्याची संधी आहे. आतापर्यंत पहिला सामना गमवून उर्वरित चार सामने जिंकण्याची किमया या दोन संघांच्या नावावर आहे.
3 / 6
112 वर्षांपूर्वी इंग्लंडने अशी कामगिरी केली होती. म्हणजेच 1912 साली इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमवून कमबॅक केलं होतं. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 1897/98 आणि 1901/02 मध्ये केलं होतं. आता अशी कामगिरी करण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.
4 / 6
भारताने या मालिकेतील पहिला सामना गमावला होता. त्यानंतर जबरदस्त कमबॅक तीन सामने जिंकत मालिका खिशात घातली. त्यामुळे पाचवा सामना जिंकून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या रेकॉर्डशी बरोबरी करणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
5 / 6
इंग्लंडने हैदराबाद कसोटी सामना 28 धावांनी जिंकला होता. त्यानंतर दुसरा कसोटी भारताने 106 धावांनी, तिसरा कसोटी सामना भारताने 434 धावांनी आणि चौथा कसोटी सामना भारताने 5 गडी राखून जिंकला होता.
6 / 6
भारताने मायदेशात सलग 17वी कसोटी मालिका जिंकली आहे. 2013 पासून विजयी मालिका सुरु आहे. भारताने सातव्यांदा पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर मालिका आपल्या नावावर केली आहे.