IND vs ENG : जो रूटने मोडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा महारेकॉर्ड, पहिल्या कसोटी सामन्यात रचला इतिहास
पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला आहे. दुसऱ्या सत्रापर्यंत निम्म्याहून अधिक संघ तंबूत परतला होता. तरीही भारतीय खेळपट्ट्यांवर पहिल्याच दिवशी 200 हून अधिक धावा करण्याची कामगिरी केली. त्यामुळे भारताला धावांचा पल्ला गाठून नवं आव्हान देणं वाटतं तितकं सोपं नाही. या सामन्यात जो रूटने एका विक्रमाची नोंद केली आहे.
1 / 7
इंग्लंडच्या जो रुट भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे. जो रुट पहिल्या डावात फक्त 29 धावा करण्यात यशस्वी ठरला. पण त्याने सचिन तेंडुलकरचा महारेकॉर्ड मोडीत काढला आहे.
2 / 7
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या आतापर्यंत सर्व कसोटी सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम हा सचिनच्या नावावर होता.आता हा विक्रम इंग्लंडच्या जो रूटच्या नावावर झाला आहे.
3 / 7
सचिनने इंग्लंडविरुद्ध 32 कसोटी सामन्यातील 53 डावात 2535 धावा केल्या होत्या. पण आता जो रुट हा पल्ला गाठून पुढे गेला आहे. त्यामुळे आता इथपर्यंत पोहोचण्यात पुढच्या काळात काही शक्य नाही.
4 / 7
भारताविरुद्धच्या 27 कसोटी सामन्यांमध्ये जो रूटने 9 शतकांसह 2536+ धावा केल्या आहेत. यासह भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम जो रूटच्या नावावर झाला आहे.
5 / 7
जो रुटने 29 धावांवर बाद होत तंबूत परतला. पण त्याने तिथपर्यंत भारताविरुद्ध 2555 धावांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे इथपर्यंत पोहोचणारा सध्यातरी एकही फलंदाज नाही. अजून 9 डावात खेळण्याची संधी त्याच्याकडे आहे.
6 / 7
विराट कोहली टॉप 5 मध्ये आहे. पण इंग्लंडविरुद्ध इतक्या धावा करण्यासाठी त्याला 600 धावांची गरज आहे. पण इतक्या धावा एकाच मालिकेत करणं कठीण आहे. त्यामुळे हा विक्रम येत्या काही काळापर्यंत कायम राहील.
7 / 7
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात 4000 धावांचा टप्पा गाठणारा जो रूट हा पहिला फलंदाज ठरला. भारताविरुद्धच्या पहिल्या डावात 29 धावांची खेळी करताना त्याने ही कामगिरी केली.