IND vs ENG : जेम्स अँडरसनने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिला वेगवान गोलंदाज
पाचवा कसोटी सामन्यावरही भारताची मजबूत पकड आहे. असं असलं तरी इंग्लंडच्या 41 वर्षीय वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने मोठा इतिहास रचला आहे. कुलदीप यादवला बाद करताच कसोटी कारकिर्दित एक मैलाचा दगड गाठला आहे. तसेच कसोटी कारकिर्दित विकेट्सचा विक्रम रचणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.
1 / 6
धर्मशाळा कसोटीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने वयाच्या 41 व्या वर्षी इतिहास रचला आहे. अँडरसनने भारताच्या पहिल्या डावात कुलदीप यादवला बाद करून कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी पूर्ण केले आहेत.
2 / 6
धर्मशाळा कसोटीच्या पहिल्या डावातील 124व्या षटकात कुलदीप यादवला बेन फॉक्सच्या हाती झेल बाद केलं. या विकेटसह जेम्स अँडरसनने इतिहास रचला. कुलदीप यादव अँडरसनचा 700 वा बळी ठरला.
3 / 6
जेम्स अँडरसनने मे 2003 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. 21 वर्षांच्या कारकिर्दीत अँडरसनने 187 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 2.79 च्या इकॉनॉमीने 700 कसोटी बळी पूर्ण केले आहेत.
4 / 6
अँडरसन 700 कसोटी विकेट घेणारा इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा एकूण तिसरा गोलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न (708) आणि श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (800) आहेत.
5 / 6
700 विकेट घेण्याची कामगिरी करण्यासाठी अँडरसनला 187 कसोटी सामन्यांचा प्रवास करावा लागला. त्याने 26.52 च्या सरासरीने 700 कसोटी बळी पूर्ण केले आहेत. अँडरसनने भारतात खेळताना 44 कसोटी विकेट घेतल्या आहेत.
6 / 6
अँडरसनने वयाच्या 30 वर्षानंतर कसोटीत 400 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. असे करणारा तो एकमेव गोलंदाज आहे. त्याच्या खालोखाल श्रीलंकेचा रंगना हेराथ (398 विकेट) आहे.