IND vs ENG : दुसऱ्या कसोटीत आर अश्विन एक दोन नव्हे तर पाच रेकॉर्डच्या वेशीवर, वाचा काय ते
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंडने भारताला दणका दिला आहे. त्यामुळे टीम इंडिया बॅकफूटवर आली आहे. आता दुसऱ्या कसोटीत कमबॅकसाठी टीम इंडियाची धडपड असणार आहे. या सामन्यात फिरकीपटू आर. अश्विन एक दोन नव्हे तर पाच रेकॉर्डच्या वेशीवर आहे. कोणते पाच विक्रम आर अश्विन आपल्या नावावर करणार ते जाणून घ्या.
1 / 6
पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 28 धावांनी पराभव केला. यामुळे टीम इंडियाचं इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याचं स्वप्न पहिल्याच सामन्यात भंगलं आहे. दुसरीकडे, पहिल्या सामन्यात आर अश्विनची कामगिरी ठिकठाक राहिली आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात आर अश्विनला पाच विक्रम करण्याची संधी आहे.
2 / 6
आर अश्विनने इंग्लंडविरुद्ध 20 कसोटी सामन्यात एकूण 93 गडी बाद केले आहेत. जर दुसऱ्या कसोटी सामन्यात तीन गडी बाद करताचा इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरेल. भागवत चंद्रशेखरच्या नावावर 23 कसोटीत 95 विकेट्स आहेत.
3 / 6
दुसऱ्या कसोटी सामन्यात 4 गडी बाद करताच आर अश्विन 500 विकेट्सचा पल्ला गाठणार आहे. भारताकडून अशी कामगिरी करणारा दुसरा गोलंदाज, तर जागतिक पातळीवर 9वा गोलंदाज असेल. अश्विनच्या नावावर कसोटीत 496 विकेट्स आहेत.
4 / 6
आर अश्विनने भारतात आतातपर्यंत 56 कसोटी सामने खेळले असून 343 विकेट्स नावावर केले आहेत. दुसऱ्या कसोटीतील दोन डावात 8 गडी बाद करताच 350 विकेट्सचा पल्ला गाठणार आहे. अनिल कुंबले मागे टाकत भारतात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरेल.
5 / 6
इंग्लंडविरुध्दच्या दुसऱ्या कसोटी 7 गडी बाद करताच आर अश्विनच्या नावावर विकेट्सचं शतक होणार आहे. अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला गोलंदाज ठरेल. तर जागतिक पातळीवर दुसरा गोलंदाज ठरेल. जेम्स अँडरसनने भारताचे 139 विकेट्स घेतले आहेत.
6 / 6
अश्विनला दुसऱ्या कसोटी सामन्यात एका डावात पाच विकेट घेता आल्या तर आणखी एक विक्रम नावावर होणार आहे. पाच गडी बाद करण्याची किमया 35 वेळा साधणार आहे. असं करताच अनिल कुंबळेचा रेकॉर्ड मोडीत निघणार आहे. कुंबळेने अशी कामगिरी 34 वेळा केली आहे.