IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत या खेळाडूचा पत्ता कापून सरफराज खानला मिळणार संधी! कसोटीच्या 11 डावात सपशेल फेल
भारत इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यात काही खेळाडूंचा फॉर्म पाहून टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. गेल्या 11 डावात साधं अर्धशतकही झळकावता आलेलं नाही. त्यामुळे बेंचवर बसलेल्या सरफराज खानला तिसऱ्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता आहे.
1 / 6
भारत इंग्लंड यांच्यात दोन कसोटी सामने पार पडले असून 1-1 ने बरोबरी झाली आहे. त्यामुळे आता उर्वरित तीन सामन्यात चढाओढ दिसून येणार आहे. त्यासाठी काही खेळाडूंना बेंचवर बसवण्याची वेळ येणार आहे. तर काही खेळाडूंवर विश्वास टाकला जाईल. यात सरफराज खान याचं नाव आघाडीवर आहे.
2 / 6
श्रेयस अय्यरचा खराब फॉर्म इंग्लंडविरुद्धही कायम आहे. विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीतही काही खास करू शकला नाही. तसेच गेल्या 11 डावांमध्ये एकही अर्धशतक न झळकावणाऱ्या अय्यरला भारतीय कसोटी संघाकडून बेंचवर बसवलं जाण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतही अय्यरची कामगिरी खराब होती.
3 / 6
श्रेयस अय्यरच्या फलंदाजीच्या तंत्रावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संघ व्यवस्थापन त्याला वारंवार संधी देत आहे. पण त्या संधीचं सोनं करण्यात अपयशी ठरला आहे. अय्यर इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही कसोटीतही अपयशी ठरला असून तिसऱ्या कसोटीत सरफराज खानला संधी देण्याची मागणी चाहते करत आहेत.
4 / 6
अय्यरच्या शेवटच्या 11 डावांवर नजर टाकली तर त्याने फक्त 4,12,0, 26, 31, 6, 0, 4*, 35, 13, 27, 29 धावा केल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या कसोटीतील त्याच्या स्थानावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अय्यरच्या जागी सरफराज खानला संधी द्यावी, अशी मागणी क्रीडाप्रेमी करत आहेत. श्रेयस अय्यरने भारतासाठी 14 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 36.86 च्या सरासरीने केवळ 811 धावा केल्या. या काळात त्याने केवळ 5 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले.
5 / 6
सरफराज खानचा देशांतर्गत रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. अलीकडेच सरफराजने इंग्लंड लायन्सविरुद्ध 160 धावांची अप्रतिम खेळी खेळली होती. नंतर केएल राहुलच्या जागी दुसऱ्या कसोटीसाठी त्याची निवड करण्यात आली. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.
6 / 6
सरफराज खानने 45 प्रथम श्रेणी सामने खेळले. त्यात त्याने 14 शतके आणि 11 अर्धशतकांच्या मदतीने 69.85 च्या सरासरीने 3912 धावा केल्या.