आर अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा, पाच गडी बाद करत रचला मोठा विक्रम

| Updated on: Mar 09, 2024 | 1:20 PM

पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात आर अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडच्या फलंदाजांना ओढलं. पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवून एक विक्रम रचला आहे. तसेच एका बाबतीत भारताचा महान फिरकीपटू अनिल कुंबळेला मागे टाकलं आहे.

1 / 5
भारताने पाचवा कसोटी सामना जिंकल्यात जमा आहे. पाचव्या सामन्याच्या दुसऱ्या डावात आर अश्विनने कमाल केली. इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला आणि विजयावर मोहोर उमटवली.

2 / 5
आर अश्विनने 14 षटकं टाकत 5 गडी बाद केले. या सह भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे याला मागे टाकलं आहे. आर अश्विनने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 5 गडी बाद केले.

3 / 5
कसोटी क्रिकेटमध्ये आर अश्विनने 36व्यांदा पाच गडी बाद करण्याची किमया साध्य केली आहे. या सर्वोत्तम खेळीसह अनिल कुंबळेचा एक विक्रम मोडीत काढला आहे.

4 / 5
अनिल कुंबळेच्या नावावर 35 वेळा पाच गडी बाद करण्याचा विक्रम आहे. आता आर अश्विनने 36 वेळा अशी कामगिरी केली आहे. तर हरभजन सिंगने 25 वेळा पाच गडी बाद केले असून आता तिसऱ्या स्थानी आहे.

5 / 5
आर अश्विनने भारतीय संघासाठी 100 कसोटी सामन्यांमध्ये 516 विकेट्स घेतल्या आहेत.  116 एकदिवसीय सामन्यांमध्ये 156 विकेट्स आहेत. याशिवाय त्याने 65 टी-20 सामन्यांमध्ये 72 विकेट घेतल्या आहेत.