IND vs ENG : 5 खेळाडू टी 20 टीममधून ‘आऊट’, तिघांना प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी नाही

| Updated on: Jan 11, 2025 | 11:44 PM

India vs England T20i Series 2025 : बीसीसीआयने मायदेशात होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या मालिकेतून 5 युवा खेळाडूंना वगळण्यात आलं आहे.

1 / 6
बीसीसीआय निवड समितीने इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. बीसीसीयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील 3 वेगवान गोलंदाज, 1 ऑलराउंडर आणि 1 विकेटकीपरला संधी दिलेली नाही. या 5 पैकी 3 खेळाडूंना तर खेळण्याचीही संधीही मिळालेली नाही. हे कोण आहेत? जाणून घेऊयात. (Photo Credit : Suryakumar Yadav X Account)

2 / 6
आवेश खान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघात होता. आवेशने त्या मालिकेतील 2 सामन्यात 2 विकेट्स घेतल्या होत्या. (Photo Credit : Bcci X Account)

3 / 6
जितेश शर्माला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. जितेशचा तेव्हा मुख्य संघात रिझर्व्ह कीपर म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. (Photo Credit : Bcci X Account)

4 / 6
रमनदीप सिंह हा देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत होता. रमनदीपने 2 सामन्यात 15 धावा केल्या होत्या. तर 1 विकेट घेतली होती. मात्र आता रमनदीपला संधी मिळाली नाही. (Photo Credit : Pti )

5 / 6
यश दयाल याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून पहिल्यांदाच भारतीय संघात निवड करण्यात आली होती. मात्र यशला पदार्पणाची संधी मिळाली नाही. आता त्याला संघातही स्थान मिळालं नाही. (Photo Credit : Pti )

6 / 6
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी संघात असलेल्या विजयकुमार वैशाख यालाही इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेसाठी डच्चू देण्यात आला आहे. विजयकुमारला तेव्हा पदार्पणाची संधी मिळाली नाही. (Photo Credit : Bcci)