IND vs ENG : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत आर. अश्विन रचणार इतिहास, 10+2 विकेट्स घेताच रेकॉर्ड
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. ही मालिका भारतातच असल्याने भारताचं पारडं जड आहे. तसेच भारतीय खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी पूरक असल्याने विकेट्सचा पाऊस पडेल. त्यामुळे फिरकीपटू आर अश्विनच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे.
1 / 7
इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. एकूण दहा डाव मिळणार आहेत. त्यामुळे आर अश्विन भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीची जादू दाखवू शकतो. पाच सामन्यात एकूण 12 गडी बाद करताच दोन विक्रम नावावर करणार आहे. आतापर्यंत एकाही भारतीय गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.
2 / 7
इंग्लंडविरुद्ध विकेट्सचं शतक करण्यासाठी आर अश्विनला फक्त 12 विकेट्सची गरज आहे. पाच सामन्यांच्या दहा डावात आरामात 12 गडी बाद करू शकतो. कारण त्याचा मागचा रेकॉर्ड एकदम जबरदस्त राहिला आहे.
3 / 7
भारताकडून या यादीत माजी फिरकीपटू बीएस चंद्रशेखर अव्वल स्थानी आहे. त्यांनी इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या 38 डावात इंग्लंडचे 95 गडी बाद केले आहेत. त्यामुळे हा विक्रम मोडण्याची अश्विनला संधी आहे.
4 / 7
आर. अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 10 विकेट घेतल्यास कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेणाऱ्या खास खेळाडूंच्या यादीत सामील होईल. अशी कामगिरी करणारा आर अश्विन दुसरा भारतीय ठरणार आहे.
5 / 7
भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. टीम इंडियासाठी 236 कसोटी डावांमध्ये गोलंदाजी करणाऱ्या कुंबळेने एकूण 619 विकेट्स घेऊन एक विक्रम रचला आहे.
6 / 7
रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांत 10 विकेट्स घेताच 500 विकेट्सचा टप्पा गाठेल. तर त्यात आणखी 2 विकेट्सची भर पडताच इंग्लंडविरुद्ध विकेट्सचं शतक पूर्ण करेल.
7 / 7
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. विशाखापट्टणममधील वायएसआर स्टेडियममध्ये दुसरा सामना, राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर तिसरा सामना, रांची येथील जेएससीए स्टेडियमवर चौथा सामना, तर धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियम पाचवा सामना असणार आहे.