IND vs IRE 1st T20I: आयर्लंड विरुद्धच्या सामन्यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराह झाला भावुक, म्हणाला…
Jasprit Bumrah : आयर्लंड विरुद्धच्या पहिला टी20 सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. पण डकवर्थ लुईस नियमानुसार कौल भारताच्या बाजूने लागला आणि विजयी घोषित करण्यात आलं. या सामन्यातील विजयासाठी जसप्रीत बुमराह याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्यानंतर आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
1 / 8
आयर्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी गेतली आहे. आयर्लंडने विजयासाठी दिलेल्या 140 धावांचा पाठलाग करताना पावसाने हजेरी लावली. पण भारताच्या धावा आयर्लंडच्या तुलनेच जास्त असल्याने 2 धावांनी विजयी घोषित करण्यात आलं. जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वातील हा पहिला विजय आहे.
2 / 8
वर्षभराच्या कालावधीनंतर जसप्रीत बुमराह याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. इतकंच काय आपल्या भेदक गोलंदाजीने आयर्लंडची दाणादाण उडवली. 4 षटकात 24 धावा देत 2 गडी बाद केले. यासाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.
3 / 8
सामन्यानंतर जसप्रीत बुमराह याने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. "मला आनंद वाटतो. मी एनसीएमध्ये बराच काळ सराव केला. तिथल्या सेशन्सना हजेरी लावली. त्यामुळे मला काही चुकत आहे असं वाटलं नाही. त्याचबरोबर नवीन काही करतोय असंही वाटत नाही. याचं सर्व श्रेय स्टाफला जातं. त्यांनी मला नव्याने उभारी दिली."
4 / 8
"माझं कमबॅक चांगलं झालं आहे. मी घाबरत नाही तर आनंदी आहे.", असं त्याने सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर जाहीरपणे सांगितलं.
5 / 8
"सामना सुरु झाला तेव्हा चेंडू स्विंग होत होता. त्याचा आम्ही चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला. सुदैवाने नाणेफेकीचा कौलही आमच्या बाजूने आला. वातावरणाची आम्हाली थोडीशी मदत झाली.", असं त्याने पुढे सांगितलं.
6 / 8
"आम्ही जिंकलो हे खरं आहे. पण काही ठिकाणी आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे. प्रत्येक खेळाडूला आत्मविश्वास असून ते कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असतात. आयपीएलमुळे आम्हाला खूप मदत झाली.", असंही जसप्रीत बुमराह याने सांगितलं.
7 / 8
आयर्लंडने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 गडी गमवून 139 धावा केल्या आणि विजयासाठी 140 धावांचं आव्हान दिलं. बॅरी मॅककार्थी याने नाबाद 51 आणि कर्टिस कॅम्पर याने 39 धावांची खेळी केली.
8 / 8
भारताकडून जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि रवि बिषअमोई यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर अर्शदीप सिंगच्या खात्यात एका विकेटची नोंद झाली. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 6.5 षटकात 2 गडी गमवून 47 धावा केल्या होत्या. नेमका तेव्हाच पावसाने हजेरी लावली. डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 2 धावांनी विजयी घोषित करण्यात आलं.