स्मृती मंधानाने मोडला हरमनप्रीत कौरचा विक्रम, अवघ्या एका वर्षात पुसला रेकॉर्ड
स्मृती मंधानाने आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात एका विक्रमाला गवसणी घातली आहे. आक्रमक फलंदाजी करत शतक ठोकलं आणि हरमनप्रीत कौरच्या नावावर असलेला विक्रम आपल्या नावे केला आहे. स्मृती मंधाना गेल्या काही मालिकांमध्ये जबरदस्त फॉर्मात असल्याचं दिसून आलं आहे.
1 / 5
भारतीय महिला संघातील सलामीची फलंदाज स्मृती मंधाना जबरदस्त फॉर्मात आहे. आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातही तिचा फॉर्म दिसून आला. तिसऱ्या शेवटच्या वनडे सामन्यात स्मृतीने 70 चेंडूत शतक पूर्ण केलं. यासह तिने वनडे क्रिकेटमध्ये एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
2 / 5
स्मृती मंधानाने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा कारनामा केला आहे. यापूर्वी हा विक्रम हरमनप्रीत कौरच्या नावावर होता. मात्र हा विक्रम आता मंधानाने आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे हा विक्रम मोठ्या फरकाने मोडीत काढला आहे.
3 / 5
हरमनप्रीत कौरने 2024 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध वनडेत 87 चेंडूत शतक ठोकलं होतं. आता स्मृती मंधानाने 70 चेंडूतच शतक ठोकलं आहे. हरमनप्रीतने 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 90 चेंडूत, जेमिमा रॉड्रिग्सने आयर्लंडविरुद्ध 2025 मध्ये 90 चेंडूत, तर हरलीन देओलने वेस्ट इंडिजविरुद्ध 2024 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 98 चेंडूत शतक ठोकलं होतं.
4 / 5
स्मृती मंधानाचं वनडे क्रिकेट करिअरमधील हे दहावं शतक आहे. वनडे क्रिकेट इतिहासात 10 शतकं ठोकणारी पहिली भारतीय ठरली आहे. तसेच जागतिक पातळीवर अशी कामगिरी करणारी चौथी फलंदाज ठरली आहे. मेग लॅनिंगने 15, सूजी बेट्सने 13, टॅमी ब्यूमोंटने 10 आणि स्मृती मंधानाने 10 शतक ठोकले आहेत.
5 / 5
मंधानाने सलग दहा डावात 50 हून अधिक धावा करण्याची किमया साधली. त्यामुळे स्मृती मंधाना जबरदस्त फॉर्मात असल्याचं दिसत आहे. स्मृतीमंधानाने वनडे क्रिकेटमध्ये एकूण 52 षटकार ठोकत हरमनप्रीतच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.