IND vs IRE: अर्शदीप सिंग याने आयर्लंड विरुद्ध मलिंगाचा सर्वात वाईट विक्रम मोडला, या यादीत कोण कोण ते वाचा

| Updated on: Aug 19, 2023 | 6:49 PM

IND vs IRE, 1st T20I: आयर्लंडविरुद्धचा पहिला टी20 सामना भारताने आपल्या खिशात घातला. पावसामुळे हा सामना थांबवावा लागला. मात्र डकवर्थ लुईस नियमानुसार भारताचा दोन धावांनी विजय झाला. या सामन्यात अर्शदीप सिंग याने एक विकेट घेत नकोसा विक्रम प्रस्थापित केला आहे.

1 / 5
IND vs IRE, 1st T20I:  भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिल्या T20 सामन्यात अर्शदीप सिंगने 4 षटकात 35 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. या स्पेलमध्ये अर्शदीप सिंग याने नो बॉलही टाकला. त्यामुळे तो नकोसा विक्रम करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बसला आहे.

2 / 5
अर्शदीपने आयर्लंडविरुद्ध टाकलेला नो बॉल त्याच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 16 वा नो बॉल होता. यासह आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. या सामन्यापूर्वी श्रीलंकेचा महान गोलंदाज लसिथ मलिंगा तिसऱ्या स्थानावर होता.

3 / 5
दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज मॉर्नी मॉर्केल हा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकणारा खेळाडू आहे. मॉर्केलच्या नावावर त्याच्या टी20 कारकिर्दीत एकूण 19 नो बॉल आहेत.

4 / 5
मॉर्केलनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली दुसऱ्या स्थानावर आहे. ब्रेट लीने एकूण 17  नो बॉल टाकले  आहेत.

5 / 5
अर्शदीप 16 नो बॉल्ससह तिसऱ्या स्थानावर पोहोचल्याने मलिंगा चौथ्या क्रमांकावर घसरला. मलिंगाने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीत एकूण 15 नो बॉल टाकले आहेत.