IND vs IRE : टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात जसप्रीत बुमराहने रचला विक्रम, आता केली अशी कामगिरी
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिलाच सामना भारत आणि आयर्लंड यांच्यात होत आहे. या सामन्यात आयर्लंडला भारतीय गोलंदाजांनी कोंडीत पकडलं. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने एका विक्रमाची नोंद केली आहे.
1 / 6
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील आठवा सामना भारत आणि आयर्लंड यांच्यात होत आहे. न्यूयॉर्कच्या नसाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना होत आहे. या सामन्यात आयर्लंडला डोकं वर काढण्याची संधीच भारतीय संघाने दिली नाही. जसप्रीत बुमराहाने या सामन्यात चमकदार कामगिरी केली.
2 / 6
जसप्रीत बुमराह हा भारतीय गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र आहे. त्याच्या गोलंदाजीचा सामना करणं भल्याभल्यांना जमत नाही. त्यामुळे त्याच्यासमोर आक्रमक खेळणं चांगलंच महाग पडू शकतं. त्याचा यॉर्कर खेळणं तर कठीण होतं.
3 / 6
आयर्लंडविरुद्ध पहिल्याच षटकात त्याने मोठ्या विक्रमाची नोंद केली. जसप्रीत बुमराहने टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिलच षटक निर्धाव टाकलं आहे.यासह कसोटी खेळणआऱ्या संघांमध्ये सर्वात जास्त निर्धाव षटकं टाकणारा गोलंदाज ठरला आहे.
4 / 6
टी20 क्रिकेटमधील जसप्रीत बुमराहचं हे 11वं निर्धाव षटक आहे. यासह त्याने भुवनेश्वर कुमारला मागे सोडलं आहे. भुवनेश्वर कुमारने टी20 करिअरमध्ये 10 षटकं निर्धाव टाकली आहेत. आता बुमराह त्याच्या पुढे निघून गेला आहे.
5 / 6
जसप्रीत बुमराहने आयर्लंडविरुद्ध एकूण 3 षटकं टाकली आणि त्यात एक षटक निर्धाव होतं. जसप्रीत बुमराहने 6 धावा देत दोन गडी बाद केले. यावेळी इकोनॉमी रेट हा 2 होता.
6 / 6
आयर्लंडचा भारताविरुद्धचा डाव अवघ्या 96 धावांवर आटोपला. 16 षटकात आयर्लंडने सर्वबाद 96 धावा केल्या. आता भारतासमोर विजयासाठी 97 धावांचं आव्हान ठेवलं.