IND vs NZ : टीम इंडियाच्या मालिका पराभवाला जबाबदार कोण? ही आहेत कारणं
India vs New Zealand 2nd Test : रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारताने मायदेशात तब्बल 12 वर्षांनंतर कसोटी मालिका गमावली. न्यूझीलंडने टीम इंडियावर दुसऱ्या कसोटी सामन्यात 113 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाच्या या मालिका पराभवाची नक्की कारण काय? जाणून घ्या.
1 / 7
न्यूझीलंडने टीम इंडियाला दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी पराभूत करुन 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने एकतर्फी आघाडी घेतली. टीम इंडियाची भारतात 12 वर्षांनी कसोटी मालिका गमावण्याची ही पहिली वेळ ठरली. टीम इंडियासाठी वॉशिंग्टन सुंदर आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी चांगली कामगिरी केली. मात्र इतरांना काही खास करता आलं नाही. टीम इंडियाच्या या पराभवाची प्रमुख कारणं जाणून घेऊयात. (Photo Credit : Bcci)
2 / 7
टीम इंडियाच्या काही फलंदाजांचा अपवाद वगळता दोन्ही सामन्यांमधील चारही डावात इतर फलंदाजांनी घोर निराशा केली. निर्णायक क्षणी टीम इंडियाने विकेट्स टाकल्या. तसेच भारतीय फलंदाज काही अपवाद वगळता मोठी भागादारी करण्यात अपयशी ठरले. (Photo Credit : Bcci)
3 / 7
भारतीय फलंदाज न्यूझीलंडच्या फिरकी जाळ्यात फसले. भारतीय फलंदाजांना न्यूझीलंडच्या फिरकीचा सामना करता आला नाही. (Photo Credit : Bcci)
4 / 7
टीम इंडियासाठी वॉशिंग्टन सुंदर याने दुसऱ्या सामन्यात दोन्ही डावात एकूण 11 विकेट्स घेतल्या. सुंदर व्यतिरिक्त इतर फिरकी गोलंदाजांना त्यांच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. (Photo Credit : Bcci)
5 / 7
तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडने परिस्थितीचा चांगला फायदा घेतला. ज्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना टिकता आलं नाही त्याच खेळपट्टीवर पाहुण्यांनी कमाल केली. (Photo Credit : Bcci)
6 / 7
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह. (Photo Credit : Bcci)
7 / 7
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के. (Photo Credit : Bcci)