IND vs NZ : पुणे कसोटीत Yashasvi Jaiswal चा कारनामा, टीम इंडियासाठी मोठी कामगिरी

| Updated on: Oct 25, 2024 | 5:09 PM

India vs New Zealand 2nd Test Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वाल याने न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात 4 चौकारांसह 60 चेंडूत 30 धावांची खेळी केली.

1 / 6
यशस्वी जयस्वाल याने न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 30 धावांची खेळी. यशस्वी यासह वयाच्या 23 वर्षांआधी कसोटी क्रिकेटमध्ये 1 हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. या निमित्ताने इतर कोणत्या फलंदाजांनी अशी कामगिरी केलीय त्यांच्याबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : Yashasvi jaiswal X Account)

2 / 6
दिग्गज गॅरी सोबर्स यांनी 1958 साली 1 हजार 193 धावा केल्या होत्या. तेव्हा ते 23 वर्षांपेक्षा लहान होते. सोबर्स यांनी तेव्हा कमी वयात आपला ठसा उमटवला होता. (Photo Credit : Icc X Account)

3 / 6
दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज ग्रॅम स्मिथ याने 2003 मध्ये 1 हजार 198 धावा केल्या होत्या. तेव्हा स्मिथ 23 पेक्षा कमी वयाचा होता. (Photo Credit : Icc Facebook Account)

4 / 6
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज 360 अर्थात एबी डी व्हीलियर्स याने 2005 साली 1 हजार 8 धावा केल्या होत्या.  कोणत्याही स्थितीत धावा करणं ही एबीची खासियत होती. (Photo Credit : Icc X Account)

5 / 6
इंग्लंडचा माजी कर्णधार एलिस्टर कुक 2006 साली 23 वर्षांपेक्षा लहान होता. तेव्हा कुकने 1 हजार 13 धावा केल्या होत्या. कुक हा संयमी आणि चिवट फलंदाज होता. (Photo Credit : Icc X Account)

6 / 6
यशस्वी जयस्वाल याने 2024 वर्षात आतापर्यंत 1 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. यशस्वीने या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यशस्वीकडून आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतही अशीच कामगिरी अपेक्षित असणार आहे. (Photo Credit : Yashasvi jaiswal X Account)