IND vs NZ : मोहम्मद शमीने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय

| Updated on: Oct 23, 2023 | 6:16 PM

IND vs NZ : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीला संधी मिळाली. या संधीचं त्याने सोनं केलं. पहिल्याच चेंडूवर विल यंगला तंबूत पाठवलं. तसेच पाच गडी बाद करत विक्रम रचला.

1 / 8
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडिया विजयीरथ ठरल्याप्रमाणे पुढे आगेकूच करत आहे. स्पर्धेत सलग पाचवा विजय मिळवला असून उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झालं आहे. दुसरीकडे, मोहम्मद शमी याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

2 / 8
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात पाच गडी बाद केले. इतिहासात दुसऱ्यांदा पाच गडी बाद करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

3 / 8
2019 वर्ल्डकपमध्ये इंग्लंड विरुद्ध पाच गडी बाद केले होते. वर्ल्डकपमध्ये पाच गडी बाद करणारा सहावा गोलंदाज ठरला होता.

4 / 8
कपिल देवने 1983 च्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 43 धावा देत 5 गडी बाद केले होते. यासह भारताकडून पाच गडी बाद करण्याचा मान कपिल देवला मिळाला होता.

5 / 8
वनडे वर्ल्डकप 1999 मध्ये रॉबिन सिंगने अशीच कामगिरी केली होती. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 21 धावा देत पाच गडी बाद केले होते.

6 / 8
वर्ल्डकप 199 मध्ये वेंकटेश प्रसाद यानेही पाच गडी बाद करण्याची किमया साधली होती. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात 27 धावा देत पाच गडी बाद केले होते.

7 / 8
आशिष नेहराने 2003 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध 23 धावा देत 6 गडी बाद केले होते.

8 / 8
2011 च्या वर्ल्डकपमध्ये युवराज सिंग याने 31 धावा देत 5 गडी बाद केले होते.