IND vs NZ : रोहित शर्मा एकाच वेळी चार कर्णधारांचा विक्रम मोडणार, ख्रिस गेलही रडारवर
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली आहे. साखळी फेरीतील 9 पैकी 9 सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे. आता उपांत्य फेरीत टीम इंडियाचा कस लागणार आहे. भारताचा न्यूझीलंडशी सामना होणार आहे.
1 / 6
टीम इंडिया जेतेपदापासून फक्त दोन विजय दूर आहे. उपांत्य फेरीत 15 नोव्हेंबरला न्यूझीलंडशी सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
2 / 6
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 9 सामन्यात 55.88 च्या सरासरीने 503 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. यात 131 धावांची सर्वोत्तम खेळी आहे.
3 / 6
उपांत्य फेरीत रोहित शर्मा न्यूझीलंड विरुद्ध 5 धावा करता एरोन फिंचचा रेकॉर्ड मोडेल. तर 37 धावा करताच रिकि पॉटिंगला मागे टाकेल. 46 धावा करताच जयवर्धनेचा विक्रम ब्रेक करेल. तर 76 धावा करताच वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरेल.
4 / 6
एरोन फिंचने 2019 मध्ये 507 धावा, रिकी पाँटिंगने 2007 मध्ये 539, महेला जयवर्धनेनं 548 धावा आणि केन विल्यमसनने 2019 मध्ये 578 धावा केल्या आहेत.
5 / 6
रोहित शर्माने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तीन षटकार ठोकताच वर्ल्डकपच्या एका पर्वात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नोंदवेल. आतापर्यंत त्याने 24 षटकार ठोकले असून ख्रिस गेलच्या नावावर 26 षटकार आहेत.
6 / 6
मुंबईचं वानखेडे स्टेडियम रोहितसाठी अनलकी ठरलं आहे. या मैदानावर वनडेत काही खास करू शकलेला नाही. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही 4 धावा करून बाद झाला होता.