IND vs NZ : दुसऱ्या कसोटीआधी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये उलथापालथ, हा प्लेयर IN हा प्लेयर OUT!
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाला काही करून कमबॅक करायचं आहे. त्यामुळे टीम इंडियाने कंबर कसली आहे. असताना तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी एका खेळाडूची एन्ट्री झाली आहे.
1 / 5
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शुबमन गिल खेळला नव्हता. मात्र आता पूर्णपण बरा झाला असून दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे संघाात एक बदल होणं अपेक्षित दिसत आहे. पहिल्या कसोटी पराभव झाल्यानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार यात काही शंका नाही.
2 / 5
बंगळुरुतील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी शुबमन गिलला मान आणि खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात खेळला नव्हता. त्यामुळे त्याच्या ऐवजी संघात सरफराज खानला संधी मिळाली होती.
3 / 5
भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रेयान टेने डोशेट यांनी सांगितलं. मधल्या फळीत केएल राहुल आणि सरफराज खान यांच्यात स्थानासाठी लढाई आहे. पण मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर केएल राहुलला संधी देण्याच्या मूडमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. पण सरफराज खानने 150 धावा केल्याने त्याला डावलता येणं कठीण आहे.
4 / 5
केएल राहुल न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही डावात फेल गेला होता. त्यामुळे त्याच्याऐवजी शुबमन गिलला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनवर क्रीडारसिकांच्या नजरा लागून आहेत.
5 / 5
भारतीय कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव , जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर.