IND vs NZ : ऋषभ पंतची झुंजार खेळी व्यर्थ, पण नावावर केला असा विक्रम
ऋषभ पंतने 48 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. ऋषभ पंतने चौकार मारून आपलं अर्धशतक झळकावलं. त्याच्या आक्रमक खेळीमुळे भारताच्या विजयाच्या आशा वाढल्या. एकीकडे आघाडीचे फलंदाज खेळपट्टीवर येऊन हजेरी लावून जात होते. तेव्हा ऋषभ पंत 100 हून अधिक स्ट्राईक रेटने फलंदाजी करत होता.
1 / 6
न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा दारूण पराभव केला. तीन पैकी तीन सामने जिंकत व्हाईटवॉश दिला. तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोवर विजयासाठी 146 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारताचा डाव 121 धावांवरच आटोपला.
2 / 6
ऋषभ पंतची एकाकी झुंज व्यर्थ गेली. ऋषभ पंतने 48 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. ऋषभ पंतने चौकार मारून आपलं अर्धशतक झळकावलं. त्याच्या आक्रमक खेळीमुळे भारताच्या विजयाच्या आशा वाढल्या. एकीकडे आघाडीचे फलंदाज खेळपट्टीवर येऊन हजेरी लावून जात होते. तेव्हा ऋषभ पंत 100 हून अधिक स्ट्राईक रेटने फलंदाजी करत होता.
3 / 6
ऋषभ पंतने 100 हून अधिक स्ट्राईक रेटने देशात दोन्ही डावात अर्धशतकी खेळी करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विरेंद्र सेहवाग आणि यशस्वी जयस्वालने अशी कामगिरी केली होती.
4 / 6
2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दिल्लीत विरेंद्र सेहवागने पहिल्या डावा 46 चेंडूत 55 आणि दुसऱ्या डावात 55 चेंडूत 55 धावा केल्या होत्या. यशस्वी जयस्वालने 2024 साली कानपूरमध्ये पहिल्या डावात 51 चेंडूत 72 आणि दुसऱ्या डावात 45 चेंडूत 51 धावा केल्या होत्या. तर ऋषभ पंतने मुंबईत पहिल्या डावात 59 चेंडूत 60 आणि दुसऱ्या डावात 57 चेंडूत 64 धावा केल्या.
5 / 6
ऋषभ पंत हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेत 50 हून अधिक षटकार मारणारा भारताचा चौथा फलंदाज ठरला आहे. बेन स्टोक्सने 92 डावात 81 षटकार, रोहित शर्माने 64 डावात 56, ऋषभ पंतने 51 डावात 50, यशस्वी जयस्वालने 26 डावात 35, जॉनी बेअरस्टोने 67 डावात 32, तर शुबमन गिलने 54 डावात 31 षटकार मारले आहेत.
6 / 6
भारताकडून सर्वाधिक षटकार मारण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत ऋषभ पंत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. विरेंद्र सेहवागने 90 षटकार, रोहित शर्माने 88, धोनीने 78, सचिन तेंडुलकरने 69, रवींद्र जडेजाने 68 आणि ऋषभ पंतने 67 धावा केल्या आहेत. (सर्व फोटो- बीसीसीआय)