IND vs NZ | न्यूझीलंडच्या खेळाडूंना किती वेतन? टीम इंडियाच्या तुलनेत किती फरक?

| Updated on: Oct 20, 2023 | 9:08 PM

India and New Zealand Cricketer Salary Comparison | टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पुढील सामना हा न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. जाणून घ्या दोघांपैकी कोणत्या टीमच्या खेळाडूंना सर्वाधिक वेतन मिळतं.

1 / 5
न्यूझीलंड क्रिकेट टीमच्या खेळाडूंना भारतीय संघांच्या क्रिकेटपटूंच्या तुलनेत फार कमी वेतन मिळतं. वार्षिक करार ते मॅच फीस म्हणून मिळणारी रक्कम यामध्येही फार फरक आहे.

2 / 5
बीसीसीआय वार्षिक करारासाठी खेळाडूंची एकूण 4 श्रेणीत वर्गवारी करते. ए प्लस, ए, बी आणि सी अशा 4 श्रेणींनुसार वार्षिक करारानुसार खेळाडूंना मानधन मिळतं. मात्र न्यूझीलंच्या खेळाडूंना श्रेणीनुसार नाही, कर रँकनुसार वेतन ठरतं.

3 / 5
बीसीसीआयच्या ए प्लस कॅटेगरीत विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे तिघे आहे. या तिघांना वार्षिक 7 कोटी मिळतात. तर न्यूझीलंडचा टॉप रँकमध्ये असलेला खेळाडू केन विलियमसन याला 5 लाख 23 हजार 396 हजार न्यूझीलंड डॉलर (2 कोटी 50 लाख भारतीय रुपये) एका वर्षासाठी मिळतात.

4 / 5
तर बीसीसीआय आपल्या खेळाडूंना ए प्लस, ए, बी आणि सी या श्रेणींनुसार अनुक्रमे 7, 5, 3 आणि 1 कोटी रुपये वार्षित देते. तर न्यूझीलंडच्या खेळाडूंचं वेतन हे रँकनुसार कमी होतं जातं. म्हणजे जर न्यूझीलंडच्या एका  खेळाडूची रँक ही 10 असेल, तर त्याला 4 लाख, 44 हजार 196 न्यूझीलंड डॉलर (2 कोटी 15 लाख रुपये) मिळतात.

5 / 5
टीम इंडिया आणि न्यूझीलंड खेळाडूंना एक मॅचसाठी मिळणाऱ्या मानधनाच्या रक्कमेत ही फार फरक आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना एका कसोटीसाठी 15, वनडेसाठी 6 आणि टी 20 साठी 3 लाख रुपये मिळतात. तर न्यूझीलडं बोर्ड आपल्या खेळाडूंना एका टेस्टसाठी 5, वनडेसाठी 2 आणि टी 20 साठी 1 लाख 20 हजार रुपये देतं.