India vs Pakistan | 5 बॉलर 10 विकेट्स, टीम इंडियाकडून पाकिस्तानचा खात्मा

| Updated on: Oct 14, 2023 | 6:28 PM

India vs Pakistan Icc Wold Cup 2023 | टीम इंडियाच्या 5 गोलंदाजांनी पाकिस्तानच्या 10 फलंदाजांचं करेक्ट कार्यक्रम केला आहे. त्यामुळे आता टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड कपमधील आठवा विजय मिळवण्यच्या उंबरठ्यावर आहे.

1 / 6
टीम इंडियाने पाकिस्तानचा टप्प्यात कार्यक्रम केला आहे. टॉस गमावून बॅटिंगला आलेल्या पाकिस्तानला टीम इंडियाच्या बॉलिंगसमोर ऑलआऊट 191 धावाच करता आल्या. टीम इंडियाच्या 5 गोलंदाजांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत पाकड्यांना चारीमुंड्या चित केलं.

2 / 6
जसप्रीत बुमराह याने 7 ओव्हरमध्ये 19 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. बुमराहने मोहम्मद रिझवान आणि शादाब खान या दोघांना गुंडाळलं.

3 / 6
उपकर्णधार हार्दिक पंड्या याने आपल्या घरच्या मैदानात 6 ओव्हरमध्ये  34 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.  हार्दिकने इमाम उल हक आणि  मोहम्मद नवाझ या दोघांना आऊट केलं.

4 / 6
कुलदीप यादव याने गेमचेंजिंग ओव्हर टाकली. कुलदीपने एकाच ओव्हरमध्ये सौद शकील आणि इफ्तिखार अहमद या दोघांचा 'टप्प्यात' कार्यक्रम केला. कुलदीपने  10 ओव्हरमध्ये 35 धावा देत 2 विकेट्स मिळवल्या.

5 / 6
लोकल बॉय रविंद्र जडेजा याने 9.5 ओव्हरमध्ये 38 धावा खर्चुन 2 फलंदाजाची विकेट घेतली. जड्डूने हसन अली आणि हरीस रौफ या दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

6 / 6
तर आयसीसी रँकिंगमधील नंबर 1 बॉलर  मोहम्मद सिराज याने 8 ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या. सिराजने नंबर 1 बॅट्समन पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम आणि अब्दुल्लाह शफीक यादोघांना माघारी पाठवलं.