IND vs SA : सूर्यकुमार यादवने मोडला मॅक्सवेल आणि रोहित शर्माचा विक्रम, शतकासह केला असा कारनामा

| Updated on: Dec 14, 2023 | 11:15 PM

दक्षिण अफ्रिका दौऱ्यात कर्णधार सूर्यकुमार यादव याने जबरदस्त खेळीचं प्रदर्शन केलं. तिसऱ्या टी20 सामन्यात कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. सूर्यकुमार यादव याने शतकी खेळीसह काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. चला जाणून घेऊयात काय ते..

1 / 6
दक्षिण अफ्रिका विरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात सूर्यकुमार यादवची बॅट चांगलीच तळपली. दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.

2 / 6
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पहिलं टी20 शतक ठोकलं. 55 चेंडूत सूर्यकुमार यादव याने शतक पूर्ण केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सूर्यकुमारचं चौथं शतक आहे.

3 / 6
सूर्यकुमार यादव 56 व्या चेंडूवर बाद झाला. या खेळीत सूर्याने 8 षटकार आणि 7 चौकारांची मदत घेतली. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सूर्याचा हा बेस्ट स्कोअर आहे.

4 / 6
सूर्यकुमार यादवने शतकी खेळीसह रोहित शर्मा आणि ग्लेन मॅक्सवेलच्या शतकांची बरोबरी साधली आहे. पण बरोबरी साधून मोठा कारनामा केला आहे.

5 / 6
ग्लेन मॅक्सवेलला चार शतकं ठोकण्यासाठी 92 डाव खेळावं लागलं. तर सूर्यकुमार यादवने चार शतकांसाठी फक्त 57 डाव घेतले. रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानावर असून चार शतकांसाठी 107 डाव घेतले.

6 / 6
कर्णधार म्हणून भारतासाठी टी20 मध्ये शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी रोहित शर्माने भारतासाठी कर्णधार म्हणून टी20 मध्ये दोन शतके झळकावली आहेत.कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवचे हे पहिले शतक होते.