1..2…3..4..5..! भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टी20त रचले इतके सारे विक्रम, वाचा
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चौथा आणि निर्णायक सामन्यात संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांचं वादळ घोंगावलं. दोघांनी शतकी खेळी करत दक्षिण अफ्रिकन गोलंदाजांची पिसं काढली. तसेच 20 षटकात 1 गडी गमवून विशालकाय 283 धावांचा डोंगर रचला. यासह भारताने या सामन्यात पाच विक्रम रचले आहेत.
1 / 6
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी20 मालिकेतील निर्णायक सामन्यात संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी जबरदस्त खेळी केली. दोघांनी नाबाद शतकी खेळई करत इतिहास रचला. या दोघांच्या शतकी खेळीमुळे भारताने 20 षटकात 1 गडी गमवून 283 धावा केल्या. संजू सॅमसनने 56 चेंडूत नाबाद 109 आणि तिलक वर्माने 47 चेंडूत नाबाद 120 धावा केल्या.
2 / 6
भारताने 20 षटकात 1 गडी गमवून 283 धावा केल्या. भारताची विदेशातील आतापर्यंत सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी भारताने इतक्या धावा केल्या नव्हत्या. भारताने यापूर्वी हैदराबादमध्ये बांगलादेशविरुद्ध 297 धावा केल्या आहे. पण या धावा भारतात केल्या आहेत. त्यामुळे विदेशातील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.
3 / 6
टी20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका डावात दोन शतकं ठोकली गेली आहेत. संजू सॅमसनने 56 चेंडूत 9 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 109 धावा केल्या. तर तिलक वर्माने 47 चेंडूत 10 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने नाबाद 120 धावा केल्या. या मालिकेत तिलक आणि संजू यांनी मिळून एकूण 4 शतके झळकावली आहेत. एखाद्या संघाने मालिकेत 4 शतके झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
4 / 6
टी20 क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्यात झाली आहे. या दोघांनी नाबाद 209 धावांची भागीदारी केली आहे. यापूर्वी मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांनी इंग्लंडविरुद्ध नाबाद 203 धावांची भागीदारी केली होती.
5 / 6
भारताने एका इनिंगमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारताकडून तिलक वर्माने 6 षटकार, संजू सॅमसनने 9 आणि अभिषेक शर्माने 4 षटकार मारले आहेत.
6 / 6
संजू सॅमसन हा एका वर्षात तीन शतकं ठोकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणीच केली नाही. संजू सॅमसनने बांगलादेशविरुद्ध 1 आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 2 शतकं ठोकली आहेत. (सर्व फोटो- बीसीसीआय)