IND vs SA Test : ऋतुराज गायकवाडच्या जागी कसोटीत या खेळाडूला मिळणार संधी, फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 22 शतकांची शिदोरी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. ही मालिका सुरु होण्यापू्र्वी टीम इंडियाला धक्का बसला आहे. भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे मालिका खेळणार नाही.
1 / 6
ऋतुराज गायकवाड याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20, वनडे आणि कसोटी मालिकेसाठी निवड झाली होती. त्याला टी-20 मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र एकदिवसीय मालिकेत ओपनिंगला उतरला होता.
2 / 6
ऋतुराज दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत खेळू शकला नाही. आता कसोटी मालिकेतही खेळणार नसून मायदेशी परतला आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अभिमन्यू ईश्वरनला भारतीय कसोटी संघात स्थान मिळू शकते.
3 / 6
भारत अ संघासोबत दक्षिण आफ्रिकेत असलेल्या अभिमन्यूचा कसोटी मालिकेसाठी विचार होऊ शकतो. ऋतुराजच्या जागी अभिमन्यूला संघात स्थान मिळू शकते. अभिमन्यू हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व करतो.
4 / 6
प्रथम श्रेणीतील त्याची कामगिरी पाहता त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी संघात स्थान मिळू शकते. अभिमन्यू देशांतर्गत क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करतो. त्यामुळे टीम इंडियाला एक चांगला फलंदाज मिळेल.
5 / 6
28 वर्षीय अभिमन्यूने आतापर्यंत 88 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 152 डावांमध्ये त्याने 47.24 च्या सरासरीने 6567 धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने 22 शतके आणि 26 अर्धशतके केली आहेत. त्याची सर्वोत्तम खेळी 233 धावा आहेत.
6 / 6
लिस्ट ए सामन्यात त्याने 88 सामन्यांमध्ये 9 शतकांच्या मदतीने 3847 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 149 धावा आहे. टी20 फॉरमॅटमध्ये त्याने 34 सामन्यांमध्ये 976 धावा केल्या आहेत आणि एक शतक आणि 5 अर्धशतकं झळकावली आहेत. यात नाबाद 107 ही सर्वोत्तम खेळी आहे.