IND vs SL: 27 वर्षानंतर श्रीलंकेने भारतीय संघाला दिला दणका, वाचा काय केलं ते
भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेत श्रीलंकेने 1-0 ने आघाडी घेतली असून विजयाच्या उंबरठ्यावर आहे. कारण भारताला ही मालिका जिंकणं आता कठीण झालं आहे. शेवटचा सामना जिंकला तरी मालिका बरोबरीत सुटेल आणि 27 वर्षांची सुरु असलेली परंपरा संपुष्टात येईल.
1 / 5
टी20 मालिकेप्रमाणे भारतीय संघ वनडे मालिकेतही कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. पण क्रीडारसिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. दिग्गज खेळाडू असूनही श्रीलंकेने पराभवाची धूळ चारली. पहिला सामना बरोबरीत सोडवल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात भारताला 32 धावांनी पराभूत केलं.
2 / 5
तीन वर्षानंतर श्रीलंकेने भारताविरुद्ध एकदिवसीय सामना जिंकला. तर चरित असलंकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकन संघ भारताविरूद्धची चालत आलेली परंपरा मोडीत काढणार आहे.
3 / 5
श्रीलंकेने तिसरा सामना जिंकला तर 27 वर्षांनंतर भारताविरुद्ध वनडे मालिका जिंकणार आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये श्रीलंकेने जबरदस्त कामगिरी केली आहे. आता तिसऱ्या सामन्यातही तशीच कामगिरी तर भारताला पराभूत करू शकतात.
4 / 5
श्रीलंकेने भारताविरुद्ध अखेरची द्विपक्षीय वनडे मालिका 1997 मध्ये जिंकली होती. त्यावेळी अरविंद डी सिल्वा, सनथ जयसूर्या, अर्जुन रणतुंगा, मुथय्या मुरलीधरन असे दिग्गज खेळाडू संघात होते.
5 / 5
तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 7 ऑगस्ट रोजी होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. रियान पराग आणि ऋषभ पंतला संधी मिळू शकते. (सर्व फोटो- बीसीसीआय)