Kuldeep Yadav याचा महारेकॉर्ड, एका झटक्यात दिग्गजांना पछाडलं
India vs Sri Lanka Asia Cup 2023 Kuldeep Yadav | कुलदीप यादव याने आशिया कप 2023 मध्ये इतिहास रचत मोठा कारनामा केला आहे. कुलदीपने लंका उद्धवस्त करत मोठा रेकॉर्ड केला.
1 / 6
टीम इंडियाने श्रीलंकेवर विजय मिळवत आशिया कप 2023 फायनलमध्ये धडक मारली. कुलदीप यादव याने या सामन्यात निर्णायक भूमिका बजावली. कुलदीपने या सामन्यात एकूण 4 विकेट्स घेतल्या. कुलदीपने यासह एका झटक्यात अनिल कुंबळे, झहीर खान आणि अजित आगरकर या 3 दिग्गजांना झटक्यात मागे टाकलं.
2 / 6
टीम इंडियाने 12 सप्टेंबरला सुपर 4 सामन्यात श्रीलंकेला 41 धावांनी पराभूत केलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 213 धावांचा शानदार बचाव केला. टीम इंडियाने विजयासोबत सुपर 4 च्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी झेप घेतली. टीम इंडियाचा अंतिम सामन्यात पाकिस्तान किंवा श्रीलंका यांच्याशी आमनासामना होऊ शकतो.
3 / 6
कुलदीप यादव याने फिरकीच्या जोरावर श्रीलंकेला सुरंग लावला. कुलदीपने 43 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या.
4 / 6
कुलदीपने याआधी पाकिस्तान विरुद्ध 5 विकेट्स घेतल्या. कुलदीप वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 150 विकेट्स घेणारा दुसरा भारतीय ठरला आहे. कुलदीपने 88 एकदिवसीय सामन्यात ही कामगिरी केली आहे. तर वेगवान 150 विकेट्स घेण्याचा विक्रम मोहम्मद शमी याच्या नावावर आहे. शमीने 80 सामन्यात हा कीर्तीमान केला आहे.
5 / 6
कुलदीपने यासह टीम इंडियाच्या अजित आगरकर, अनिल कुंबळे आणि झहीर खान या माजी दिग्गजांचा रेकॉर्ड ब्रेक केला. कुंबलने 106, झहीरने 103 आणि आगरकरने 97 डावात 150 विकेट्स पूर्ण केल्या होत्या.
6 / 6
कुलदीप यासह सर्वात वेगवान 150 विकेट्स घेणारा चौथा फिरकीपटू ठरला. त्याआधी पाकिस्तानचा साकेलन मुश्ताक (78), राशिद खान (80) आणि अजंता मेंडीस (84) डावात 150 विकेट्स घेतल्या होत्या.