टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. जडेजा यासह अशी कामगिरी करणारा टीम इंडियाचा पहिला गोलंदाज ठरला आहे.
रवींद्र जडेजा आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. जडेजाने यासह आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
जडेजाने टीम इंडियाचा माजी गोलंदाज इरफान पठाण याला पछाडत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला. जडेजाला श्रीलंका विरुद्धच्या सामन्याआधी हा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 1 विकेटची गरज होती.
जडेजाने श्रीलंका टीमचा कॅप्टन दासून शनाका याला आऊट केलं. जडेजा यासह टीम इंडियाकडून आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कीर्तीमान आपल्या नावावर केला. जडेजाच्या नावावर आता आशिया कपमध्ये 23 विकेट्स झाल्या आहेत.
तर इरफान पठाण याने टीम इंडियासाठी 22 विकेट्स घेतल्या होत्या.अखेर अनेक वर्षांनंतर इरफानचा हा रेकॉर्ड मोडीत निघाला आहे.