IND vs SL : श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात 26 धावा करत सूर्यकुमार यादवने रचला विक्रम, काय केलं वाचा
भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामने जिंकून भारताने मालिका खिशात घातली आहे. दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमारने 26 धावा करत एका विक्रमाला गवसणी घातली आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत
1 / 5
सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून टी20 क्रिकेटमध्ये 8 डाव खेळला आहे. यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात 216.67 च्या स्ट्राईक रेटने 12 चेंडूत 26 धावा केल्या.
2 / 5
सूर्यकुमारने या डावात 1 षटकार आणि 4 चौकार मारले. तसेच भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या खेळीसह सूर्यकुमार यादवने बाबर आझम, मिचेल मार्श आणि ग्रीम स्मिथचा रेकॉर्ड मोडला आहे.
3 / 5
सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून 8 डावात आतापर्यंत 365 धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर ग्रीम स्मिथ (347), तिसऱ्या स्थानावर मिचेल मार्श (346) आणि चौथ्या स्थानावर बाबर आझम असून त्याने 340 धावा केल्या आहेत.
4 / 5
सूर्यकुमार यादवने 9 सामन्यात भारताचं कर्णधार भूषवत सर्वाधिक सामने जिंकण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. सूर्याने 9 पैकी 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तर हार्दिक पांड्याने 6 सामन्यात विजय मिळवला आहे. रोहित शर्मा या यादीत आघाडीवर असून त्याने 9 पैकी 8 सामने जिंकले होते.
5 / 5
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा सामना 30 जुलैला होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ श्रीलंकेला टी20 मध्ये व्हाइटवॉश देण्याचा प्रयत्न करेल. आता भारताने मालिका 2-0 ने जिंकली आहे.