भारत विरुद्ध श्रीलंका टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवची बॅट चांगलीच तळपली. कर्णधारपदाला साजेशी खेळी करत अर्धशतक ठोकलं. त्यामुळे संघाच्या 200 पार धावा जाण्यास मदत झाली.
सूर्यकुमार यादवने 22 चेंडूत अर्धशतक ठोकलं. यावेळी त्याने 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्यानंतर 28 चेंडूत 58 धावा करत बाद झाला. या खेळीसह त्याने विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली.
सूर्यकुमार यादवने 223.08 च्या स्ट्राईक रेटने 50 हून अधिक धावा केल्या. या खेळीसह कर्णधार सूर्यकुमार यादवने विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. सूर्यकुमार यादवने कर्णधारपदी विराजमान होताच पहिल्यांदा 200 हून अधिक स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
विराट कोहली कर्णधार असताना एकदा 200 हून अधिक स्ट्राईक रेटने 50 हून अधिक धावा केल्या होत्या. आता सूर्यकुमार यादवने विराट कोहलीच्या या विक्रमाशी बरोबरी केली आहे. भारताकडून टी20 क्रिकेट फॉर्मेटचा कर्णधार असताना रोहित शर्माने दोन वेळा 200 हून अधिक स्ट्राईक रेटने 50हून अधिक धावा केल्या आहेत.
सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून बाबर आझम आणि क्विंटन डी कॉकची बरोबरी केली आहे. सात डावात 50 हून अधिक धावा केल्या आहेत. बाबर आणि क्विंटनसारखं त्याने चौथ्यांदा अर्धशतकी खेळी केली आहे.