IND vs WI: पहिल्या वनडेसाठी शार्दुल ठाकुर याच्या जागी या खेळाडूला मिळणार संधी, कोण ते वाचा
IND vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका 27 जुलैपासून सुरु होणार आहे. या सामन्यात शार्दुल ठाकुरच्या जागी अष्टपैलू खेळाडूला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
1 / 6
दुसऱ्या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकुर मांडीच्या दुखापतीमुळे खेळला नव्हता. बीसीसीआयने याबाबत पत्रक जारी केलं होतं. तसेच दुसऱ्या कसोटीत मुकेश कुमार याला संधी मिळाली होती.
2 / 6
पहिल्या वनडेसाठी अवघे काही तास शिल्लक असताना शार्दुलच्या रिकव्हरीबाबत अद्याप कोणतेही अपडेट समोर आलेले नाहीत. त्यामुळे शार्दुल ठाकूर पहिल्या वनडेसाठी मुकण्याची शक्यता आहे.
3 / 6
शार्दुल ठाकूरला पहिल्या एकदिवसीय सामन्यातून वगळण्यात आले तर, अष्टपैलू अक्षर पटेलचा संघात समावेश केला जाऊ शकतो.
4 / 6
चांगल्या फॉर्ममध्ये असलेला अक्षर पटेल फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही ठिकाणी टीम इंडियाला महत्त्वाच्या वेळी मदत करू शकतो.
5 / 6
शार्दुलला कसोटी मालिकेत फारसे योगदान देता आले नाही. खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटीत ठाकूरने केवळ सात षटके टाकली आणि फक्त एक विकेट घेतली.
6 / 6
भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल,ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.