IND vs WI: अश्विन-जडेजा या जोडीच्या नावावर असा विक्रम, वेस्ट इंडिजच्या मैदानावर नवा रेकॉर्ड
आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये एकत्रितपणे 500 गडी बाद करण्याचा विक्रम नोंदवला आहे. भारतासाठी अशी कामगिरी करणारी दुसरी जोडी ठरली आहे.
1 / 6
भारताची आघाडीची फिरकीपटू जोडी म्हणून ख्याती असलेल्या आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी दुसऱ्या कसोटीत एकत्रितपणे पाच गडी बाद केले आणि कसोटी क्रिकेटमध्ये मैलाचा दगड गाठला.
2 / 6
भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 500 गडी बाद करणारी ही दुसरी जोडी ठरली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अश्विनने दोन गडी बाद केले आणि एका विक्रमाची नोंद केली.
3 / 6
यापूर्वी अनिल कुंबले आणि हरभजन सिंग जोडीने 500 हून अधिक कसोटी बळी घेतले होते. या दोघांनी मिळून 501 गडी बाद केले आहेत.
4 / 6
अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी एकत्रितपणे 54 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी 501 गडी बाद केले आहेत. यात कुंबळेच्या वाट्याला 281 आणि हरभजन सिंगच्या नावावर 220 विकेट्स आहेत.
5 / 6
आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी 49 कसोटी सामन्यात 500 गडी बाद केले आहेत. यात अश्विनने 274 विकेट्स, तर रवींद्र जडेजाने 226 गडी बाद केले आहेत.
6 / 6
भारतासाठी सर्वाधिक बळी घेणाऱ्या जोडीच्या यादीत बिशन बेदी आणि बीएस चंद्रशेखर ही जोडी तिसऱ्या स्थानावर आहे. या दोघांनी एकत्रितपणे 42 कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी 368 गडी बाद केले. यात बिशन बेदी यांच्या वाटेला 184 आणि बीएस चंद्रशेखर यांच्या वाटेला 184 गडी आले.