IND vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धचे शेवटचे दोन टी20 सामने होणार अमेरिकेत, टीम इंडियाचा रेकॉर्ड काय आहे? ते जाणून घ्या

| Updated on: Aug 10, 2023 | 9:09 PM

IND vs WI : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पाच टी20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत 2-1 ने वेस्ट इंडिज आघाडीवर आहे. तर मालिकेत बरोबरी साधण्यासाठी चौथा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. अन्यथा ही मालिका थेट वेस्ट इंडिजच्या खिशात जाईल. विशेष म्हणजे शेवटचे दोन सामने अमेरिकेत होणार आहेत.

1 / 8
टी20 मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने कमबॅक केलं आहे. आता शेवटचे दोन सामने महत्त्वाचे ठरणार आहेत

2 / 8
या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांचे यजमानपद वेस्ट इंडिजकडे होतं. तर उर्वरित दोन सामन्यांचे यजमानपद अमेरिका करत आहे. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या टी-20 सामना खेळण्यासाठी संघ अमेरिकेला रवाना झाला आहे.

3 / 8
अमेरिकेत टीम इंडिया उर्वरित दोन सामने जिंकली तरच टी-20 मालिका जिंकेल. वेस्ट इंडिजने आणखी एक सामना जिंकल्यास ते टी20 मालिका जिंकतील.

4 / 8
दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये होणार आहेत. या मैदानावर मेजर लीग क्रिकेट खेळले आहेत. त्यावेळी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे हे सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होईल अशी आशा आहे.

5 / 8
चौथा टी20 सामना 12 ऑगस्टला फ्लोरिडामध्ये खेळवला जाणार आहे. सामना रात्री 8 वाजता सुरू होईल.या मैदानावर मालिकेतील शेवटचा आणि पाचवा टी20 सामना असेल.

6 / 8
लॉडरहिल येथे खेळल्या गेलेल्या 4 पैकी 3 सामने विंडीजने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित ठरला आहे. दुसरीकडे, 2022 मध्ये येथे खेळलेले शेवटचे दोन सामने भारताने जिंकले होते.

7 / 8
फ्लोरिडातील मैदान संथ खेळपट्टीसाठी ओळखले जाते. चौथा सामन्यात टीम इंडियात काहीच बदल नसेल असं सांगण्यात येत आहे. संजू सॅमसन यष्टिरक्षण करेल अशी क्रीडाप्रेमींची आशा आहे.

8 / 8
पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने टी20 विश्वचषक होत असल्याने या मैदानावरील दोन सामने टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.