IND vs WI : आर. अश्विन नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर, अशी कामगिरी करणारा 16 वा गोलंदाज ठरणार

| Updated on: Jul 11, 2023 | 6:47 PM

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामना 12 जुलैपासून सुरु होणार आहे. या मालिकेत आर अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. काय ते वाचा

1 / 6
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून आहे. या सामन्यात आर. अश्विन विक्रमाचा एक पल्ला गाठण्याच्या वेशीवर आहे.

2 / 6
आर अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 गडी पूर्ण करू शकतो. यासाठी त्याला फक्त तीन विकेट्सची आवश्यकता आहे.

3 / 6
तीन विकेट घेतल्यानंतर आर. अश्विन 700 गडी बाद करणारा 16 वा खेळाडू ठरणार आहे. आर. अश्विनच्या नावावर 270 सामन्यात 697 विकेट्स आहेत.

4 / 6
आर. अश्विनने 92 कसोटी सामन्यात 474, 113 वनडे सामन्यात 151 विकेट्स आणि 62 टी20 सामन्यात 72 गडी बाद केले आहेत.

5 / 6
अश्विनने 700 गडी पूर्ण करताच दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज डेल स्टेन याला मागे टाकणार आहे. स्टेनने 265 आंतरराष्ट्रीय सामन्यात 699 गडी बाद केले आहेत.

6 / 6
आर. अश्विन येत्या काही सामन्यात भारताचा माजी फिरकीपटून हरभजन सिंग याचाही विक्रम मोडू शकतो. हरभजन सिंगने 367 सामन्यात 711 विकेट्स घेतले आहेत.