IND vs WI : तिलक वर्मा याने आपलं पहिलं अर्धशतक रोहित शर्मा याच्या मुलीला केलं समर्पित, का ते जाणून घ्या
IND vs WI 2nd T20 : पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत वेस्ट इंडिजने 2-0 ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यातही फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. पण तिलक वर्माने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यातील पहिलं अर्धशतक झळकावलं आणि ते टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याची मुलगी समायराला समर्पित केलं.
1 / 8
भारताच्या तिलक वर्मा याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात अर्धशतक झळकावलं. आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचं पहिलंच अर्धशतक आहे. तिलकने 41 चेंडूत 51 धावा केल्या. तसेच भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यास मदत केली.
2 / 8
तिलक वर्माच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघाला 150 धावांपर्यंत मजल मारता आली. त्याने 41 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 51 धावा केल्या. पण वेस्ट इंडिजने 19 षटकात 8 गडी गमवून दिलेलं आव्हान पूर्ण केलं.
3 / 8
दुसऱ्या सामन्यात झळकावलेलं अर्धशतक तिलक वर्मा याने रोहित शर्मा याची मुलगी समायराला समर्पित केलं आहे.
4 / 8
तिलक वर्मा याने पत्रकार परिषदेत सांगितलं की, रोहित शर्माची मुलगी आणि माझ्यात एक चांगलं नातं आहे. मी जेव्हा पहिलं शतक किंवा अर्धशतक झळकावेन तेव्हा तिला समर्पित करण्याचं वचन दिलं होतं.
5 / 8
"मी सॅमीसाठी होतं. मी सॅमीच्या खूप जवळ आहे. मी तिला वचन दिलं होतं की, जेव्हा स्कोअर करेन तेव्हा तिच्यासाठी सेलिब्रेट करेन.", असं तिलक वर्मा याने पत्रकार परिषदेत सांगितलं.
6 / 8
तिलक वर्मा याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी अर्धशतक झळकावणारा दुसरा तरुण खेळाडू ठरला आहे. तसेच ऋषभ पंत याचा विक्रम मोडीत काढला आहे.
7 / 8
रोहित शर्मा याने 20 वर्षे 143 इतकं वय असताना टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं अर्धशतकं झळकावलं होतं. त्यानंतर तिलक वर्मा याने 20 वर्षे आमि 271 दिवसात अर्धशतक झळकावलं आहे. तर ऋषभ पंत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 21 वर्षे आणि 38 दिवसात ही कामगिरी केली होती.
8 / 8
रोहित शर्मा याने पहिले अर्धशतक 2007 टी20 वर्ल्डकपमध्ये झळकावले होते. ऋषभ पंत याने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमध्ये 2018 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं. तर तिलक वर्मा याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात हा विक्रम केला आहे.